घरट्रेंडिंगTurkey Earthquake: तुर्कीतील भूकंपाबद्दल सर्वात आधी पक्ष्यांना चाहूल? हा VIRAL VIDEO एकदा...

Turkey Earthquake: तुर्कीतील भूकंपाबद्दल सर्वात आधी पक्ष्यांना चाहूल? हा VIRAL VIDEO एकदा पाहा

Subscribe

हा व्हिडीओ भूकंप येण्यापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे, या व्हिडीओमध्ये पक्ष्यांची विचित्र हालचाल पहायला मिळतेय.

Turkey Bird Viral Video : तुर्कीस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भीषण भूकंपात आतापर्यंत ३६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर १६ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तुर्कीस्तानमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी मोजण्यात आली. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तुर्कीने मृतांसाठी ७ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. आतापर्यंत एकूण ७,३४० लोकांना वाचवण्यात यश आले असून १३ हजार २९३ लोक जखमी झाले आहेत.

ज्यावेळी हा भूकंप झाला त्यावेळी अर्ध्याहून अधिक लोक आपापल्या घरात शांतपणे झोपले होते. या घटनेचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. काही व्हिडीओंमधून भूकंपाचे क्षण आणि त्यानंतर झालेला विध्वंस दाखवण्यात आला आहे. ट्विटरवर सध्या एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्येही भूकंपाचा विध्वंस पहायला मिळतोय.

- Advertisement -

हा व्हिडीओ भूकंप येण्यापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे, या व्हिडीओमध्ये पक्ष्यांची विचित्र हालचाल पहायला मिळतेय. पक्षी आकाशात घिरट्या घालत विचित्र आवाज काढताना ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. हा आवाज अतिशय कर्कश आणि मोठा असल्याचं दिसतंय. अचानक आकाशात पक्ष्यांचं हे विचित्र वागणं पाहून तिथल्या काही लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेत. त्यानंतर सोमवारी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप झाला. त्यामुळे आता पक्षांच्या या विचित्र वागण्याचा संदर्भ भूकंपाच्या घटनेसोबत जोडला जात आहे.

पाहा हा व्हायरल व्हिडीओ :


हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलाय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ‘निसर्गाची अलार्म सिस्टम. जे ऐकण्यासाठी आपण अद्याप निसर्गाशी पूर्णपणे जोडले गेलो नाही.’ असं लिहित हा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. या व्हिडीओला त्यांनी ‘नेचर अलार्म’ असं म्हटलंय.

- Advertisement -

बचाव कर्मचारी काळजीपूर्वक काँक्रीटचे दगड आणि लोखंडी रॉड काढत आहेत, जेणेकरून वाचलेल्या नागरिकांना ढिगाऱ्यातून सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. अनेक लोक आपल्या कुटूंबियांच्या शोधात नुकसान झालेल्या इमारतींजवळ जमा होत आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीस्तानच्या गाझिआनटेप शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर होता. भूकंपग्रस्त भागातील लोकांनी शॉपिंग मॉल्स, स्टेडियम, मशिदी आणि कम्युनिटी सेंटरमध्ये आश्रय घेतला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -