घरताज्या घडामोडीब्लू टिकसाठी पैसे मोजूनही बनावट खात्यांचा सुळसुळाट

ब्लू टिकसाठी पैसे मोजूनही बनावट खात्यांचा सुळसुळाट

Subscribe

ट्विटर ब्लू टिक्ससाठी दरमहा 8 डॉलर आकारण्याचा एलॉन मस्क यांनी निर्णय घेतला होता. मात्र एलॉन मस्क यांचा हा निर्णय आता अडचणीत सापडला आहे. कारण अनेक बनावट खातेधारकांनी 8 डॉलर भरून ब्लू टिक मिळवल्याची माहिती समोर येत आहे.

ट्विटर ब्लू टिक्ससाठी दरमहा 8 डॉलर आकारण्याचा एलॉन मस्क यांनी निर्णय घेतला होता. मात्र एलॉन मस्क यांचा हा निर्णय आता अडचणीत सापडला आहे. कारण अनेक बनावट खातेधारकांनी 8 डॉलर भरून ब्लू टिक मिळवल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या खात्याद्वारे बनावट ट्विट पोस्ट केल्या. त्यामुळे एलॉन मस्कचा हा निर्णय वादात सापडला आहे. हे सगळे खातेधारक यूएसमधील असल्याचे समजते. (twitter suspends 8 subscription program due to fake accounts)

अमेरिका आणि इतर देशांमध्ये ट्विटरचे नवीन सबस्क्रिप्शन घेण्यासाठी दरमहा 8 डॉलर किंमत होती. ज्यामध्ये ट्विटरवर अतिरिक्त वैशिष्ट्यांसह ब्लू टिक्स किंवा बॅज दिले जात होते. मात्र, आता ट्विटरवरून ब्लू टिक व्हेरिफिकेशनचा पर्याय अचानक गायब झाला आहे. रिपोर्टनुसार, अनेक प्रसिद्ध ब्रँड आणि सेलिब्रिटींच्या फेक अकाउंट्समध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

ट्विटरवर यापूर्वी वापरकर्त्यांना ओळख पडताळणीनंतर ब्लू टिक्स दिले जात होते, पण आता अमेरिकेसह काही देशांमध्ये वापरकर्ते पैसे देऊन ब्लू टिक्स खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. ट्विटरने बुधवारी ही सेवा सुरू झाल्यानंतर युजर्सनी या सुविधेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. व्हेरिफाईड अकाऊंटवरून फेक ट्विटही येऊ लागले होते, त्यानंतर ट्विटरने सशुल्क सेवेचा निर्णय सध्यातरी अनुपलब्ध केला.

एलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटर विकत घेण्यापूर्वी ब्लू टिक्स फक्त सेलिब्रिटी, पत्रकार, राजकारणी इत्यादींसाठी उपलब्ध होते. तसेच, ट्विटर खाती प्रमाणित करण्यासाठी वापरण्यात यायचे. परंतु, मस्कच्या नवीन नियमांनुसार आता फोन, क्रेडिट कार्ड आणि दरमहा 8 डॉलर खर्च करण्याची क्षमता असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ब्लू टिक मिळेल.

- Advertisement -

दरम्यान, मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून गोंधळ सुरू झाले आहे. इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ट्विटरचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी ली किसनर, मुख्य गोपनीयता अधिकारी डॅमियन किरन आणि मुख्य अनुपालन अधिकारी मॅरियन फोगर्टी यांचा समावेश आहे. यासोबतच ट्विटरचे चीफ ऑफ मॉडरेशन अँड सेफ्टी येओल रोथ यांनीही राजीनामा दिला आहे.


हेही वाचा – अॅमझॉनची कर्मचारी कपातीची घोषणा; अनेकांचे रोजगार धोक्यात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -