घरताज्या घडामोडीजम्मू विमानतळावर ५ मिनिटात दोन स्फोट, स्फोटासाठी दोन ड्रोनचा वापर

जम्मू विमानतळावर ५ मिनिटात दोन स्फोट, स्फोटासाठी दोन ड्रोनचा वापर

Subscribe

स्फोटात केवळ इमारतीच्या गच्चीचे नुकसान झाले असून कोणतीही जिवीत हानी झालेली नाही, उत्तर भारतात हाय अलर्ट

जम्मूतील हवाई दलाच्या विमानतळावर रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी ड्रोनच्या सहाय्याने दोन स्फोट केले. या स्फोटात दोन जवान जखमी झाले असून विमानतळाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या विमानतळावर तैनात असलेले हेलिकॉप्टर उडवून देण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून पहिल्यांदाच हल्ल्यासाठी ड्रोन्सचा उपयोग करण्यात आला आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. या स्फोटानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहे.

जम्मू विमानतळात टेक्निकल एरियामध्ये शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास मोठ्या स्फोटांचे आवाज आले. या स्फोटात कोणीतीही जिवीत हानी झालेली नाही. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेंसिक टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी शोधकार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाचे आवाज जम्मू एअरपोर्टजवळ असेल्या एअरफोर्स स्टेशनवरुन आला होता. हा परिसराचा हाय सिक्युरिटीमध्ये समावेश होतो. रात्री २ वाजताच्या सुमारास ५ मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले. या स्फोटासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. (Use of two drones for Jammu airport Explosion)   पहिल्या स्फोट हा एका इमारतीच्या गच्चीवर झाला. तर दुसरा स्फोट जमीनीवर झाला. वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात केवळ इमारतीच्या गच्चीचे नुकसान झाले असून कोणतीही जिवीत हानी झालेली नसून यात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहे.  (Two Explosion heard inside Jammu airport technical area in 5 minutes, forensic team arrives at the scene)

- Advertisement -

- Advertisement -


या स्फोटानंतर विमानतळाचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला. पोलीस आणि फॉरेंसिक टीम त्याचबरोबर सिनीअर अधिकारी आणि बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरफोर्स स्टेशनमध्ये हे स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही ही चांगली बाब आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही इक्विपमेंटचे देखील नुकसान झालेले नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु असून त्यानंतर संपूर्ण चित्र समोर येईल,असे त्यांनी म्हटले आहे.


शनिवारी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सैन्य दलाला लक्ष करत सीआरपीएफच्या जवानांवर बाबरशाह परिसरात ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान वाचले असून तीन नागरिक जखमी झाले.

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, एकाला अटक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. या प्रकरणी लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५ ते ६ किलो अतिसंवेदनशील स्फोटके (IED) जप्त करण्यात आली आहे. तो हे स्फोटके गर्दीच्या ठिकाणी पेरणार होता, असे चौकशीत समोर आले आहे. त्याची चौकशी सुरू असून आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे.


हेही वाचा – Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा ठरणार घातक? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -