घरदेश-विदेशअवंतीरोपामध्ये वायुसेनेच्या बसला अपघात; दोन जवानांचा मृत्यू

अवंतीरोपामध्ये वायुसेनेच्या बसला अपघात; दोन जवानांचा मृत्यू

Subscribe

या अपघात दोन जवानांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहे. या अपघात प्रकणाची चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहे.

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये भारतीय वायुसेनेच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वायुसेनेचे दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अवंतीपोरा येथे वायुसेनेचे तळ आहे. या तळाच्या दिशेने बसमधून जवानांना घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली आहे. या अपघात प्रकणाची चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहे.

- Advertisement -

जवानांच्या बसला अपघात वायुसेनेच्या तळाच्या बाहेर मलंगपोराजवळ झाला आहे. या अपघातामध्ये स्क्वॉड्रन लीडर राकेश पांडे आणि कोरपोरल अजय कुमार या जवानांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर एक अधिकारी आणि एक एअरमॅन जखमी झाले आहेत. जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय वायुसेनेने या अपघाताला गांभिर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -