घरताज्या घडामोडीब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये २ हजार रूम, कवॉरंटाईन सक्तीची

ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये २ हजार रूम, कवॉरंटाईन सक्तीची

Subscribe

ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये दोन रुमची सोय करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आल्याने राज्य सरकारच्या आदेशाने मुंबईत अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईत २३ डिसेंबरपासून ब्रिटनमधून येणाऱ्या आणि मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ब्रिटनमधून अगोदरच निघालेल्या ५ विमानांमधून तब्बल १ हजार प्रवासी मुंबईत येणार आहेत. आज रात्रीपर्यंत दोन विमाने, उद्या सकाळपर्यंत दोन विमाने आणि रात्री १ विमान अशा ५ विमानांमधून येणाऱ्या २ हजार प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येणार आहे.

विविध हॉटेल्समध्ये २ हजार रूमची व्यवस्था

- Advertisement -

ब्रिटनमधून येणाऱ्या ज्या प्रवाशांना कोरोनाबाबत काही लक्षणे आढळतील त्यांना तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी एअरपोर्टवरून थेट नेण्यात येणार आहे. तर ज्यांना काही लक्षणे नसतील त्यांना मुंबईतील ताज, जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेल, ट्रायडंट हॉटेल्स आदी हॉटेल्समधील दोन हजार रूममध्ये सक्तीने किमान ७ ते १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. पुढे त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आज पत्रकार परिषदेत दिली. आजच हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकित हॉटेल ताजमध्ये ४१० रुम, हॉटेल ट्रायडटमध्ये ३०० रुम, हॉटेल जे.डब्ल्यू मॅरिएटमध्ये ३०० – ३५० रूम आणि ज्यांच्या बजेटची अडचण असेल त्यांच्यासाठी कमी दरातील १ हजार रुमची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

तसेच, युरोपच्या इतर देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाबाबत काही लक्षणे आढळून येतील त्यांना थेट एअरपोर्ट येथून जी. टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्या प्रवाशांची चाचणी ५-७ दिवसात निगेटिव्ह येईल. त्यांना नंतर घरी पाठविण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच, इतर देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. संशयित प्रवासी आणि ज्यांमध्ये कोरोना लक्षणे आढळतील त्यांना नियमित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात येणार आहे. तसेच, ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच, ज्या प्रवाशांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल, त्यांनीच तेथील राहणे आणि जेवणाचा खर्च हॉटेलला द्यायचा आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

- Advertisement -

२३ डिसेंबरपासून ब्रिटनमधील विमानांना बंदी

केंद्र व राज्य सरकारने ब्रिटनमधील नवीन विषाणूच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी येत्या २३ डिसेंबरपासून ब्रिटनमधून येणाऱ्या आणि मुंबईतून ब्रिटनसाठी रवाना होणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी; पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -