घरदेश-विदेशमाझ्या गांधीनगरमध्ये येण्यानं अनेकांच्या पोटात दुखलं - उद्धव ठाकरे

माझ्या गांधीनगरमध्ये येण्यानं अनेकांच्या पोटात दुखलं – उद्धव ठाकरे

Subscribe

गुजरात गांधीनगरमध्ये आज एनडीएतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आज, शनिवारी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी घटक पक्षातील प्रमुखे नेते यांना पाठिंबा दर्शवण्याकरता गांधीनगरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात त्यांनी अपेक्षेप्रमाणे विरोधकांना टोला लगावला आहे. माझ्या गांधीनगरमध्ये येण्याने अनेकांच्या पोटात दुखलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं. या पोटदुखीचा इलाज आमच्याकडे आहे, असेही ते म्हणाले. तसेच भाजप शिवसेनेत असलेल्या मतभेदाबाबतही त्यांनी भाष्य केलं.

- Advertisement -

काय म्हणाले उद्धव ठाकरे

भाजप आणि शिवसेनेत मतभेद नक्कीच होते. मात्र आम्ही ते एकत्र बसून आपापसात बोलून सोडवले. अमित शहा आपल्याला भेटायला आले. आमच्यात चर्चा झाली आणि दोन्ही पक्षातील मतभेद दूर झाले. शिवसेना – भाजपची विचारधारा एकच आहे. आमचे विचार आणि हृदय जुळले आहे. आमचे विचार, नेता आणि एकच ध्येय आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, आमची मनं जुळली आणि विरोधकांचे हात जुळले, असा टोलाही त्यांनी विरोधकांच्या ५६ पक्षातील महाआघाडीबाबत लगावला. विरोधकांकडे नेतृत्व करणारा एकही चेहरा नाही. त्यांनी त्यांच्या एका नेत्याचं नावं सांगावं, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला. आपण येथे अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचे ठाकरे म्हणाले. एकीकडे उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरु असताना दुसरीकडे सभेमध्ये मोदींच्या नावाचा जयघोष होत असल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -