घरदेश-विदेशयुकेत शिख समुदाय बाळगू शकणार कृपण

युकेत शिख समुदाय बाळगू शकणार कृपण

Subscribe

शिखांची धार्मिक कृपण ला ब्रिटेन संसद मान्यता देणार आहे. शस्त्रास्त कायद्याअंतर्गत युकेतील शिखांना येत्या काळात कृपण बाळगता येणार आहे. शिखांसाठी ब्रिटेन एक मोठी निर्णय घेत असल्याने शिखांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ब्रिटन मधील शिख नागरिकांसाठी ब्रिटेनच्या सरकार विशेष कायदे पास करणार आहे. युकेतील शस्त्रास्त कायद्याअंतर्गत युकेतील शिखांना येत्या काळात कृपण बाळगता येणार आहे. कृपण एक धारदार शस्त्र आहे जी शिखांची धर्मिक ओळख आहे. युकेतील शस्त्र कायद्याअंतर्गत कृपण बाळगण्याची परवानगी नसल्याने मागील अनेक महिन्यांपासून मागणी केली जात होती. याच बरोबर ब्रिटनमध्ये २०२१ पर्यंत शिखांना तेथील रहिवाशांचा दर्जा मिळणार असल्याचे सांगण्यात आली. शिख धर्मालाही ब्रिटनमध्ये धर्माचा दर्जा दिला जाणार आहे. शिख समुदायांसाठी ही एक मोठी संधी मिळणार आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये हा कायदा लवकरच पास केला जाणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. कॅनडा नंतर आता ब्रिटन येथीही शिखांना मान्यता मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शंभर हून अधिक संसद सदस्यांनी केली होती मागणी 

मागीलवर्षी ब्रिटनमधील भारतीय संसद सदस्यांनी ही मागणी केली होती. १०० हून अधिक संसद सदस्यांनी शिखांना नागरिकत्व देण्याची मागणी केली होती. २०११ मध्ये ब्रिटनमध्ये शिखांची जणगणना करण्यात आली होती. यामध्ये ८३ हजार शिखांनी मूळ निवाशी असल्याचा पर्याय निवडला नव्हता. यामुळे ब्रिटनमध्ये शिखांना मूळ निवाशांचे स्थान मिळाले नाही.

- Advertisement -

“शिखांना कृपण बाळगण्याची परवानगी मिळणार असल्याचा निर्णयावरून सरकार सकारात्मक आहे. कृपण हे शिखांच्या धर्माशी जोडल्या गेलेली महत्वाची वस्तू आहे. हा निर्णय ब्रिटिशांनी घेणे ही एक मोठी गोष्ट आहे.”- ब्रिटिश संसद,खासदार, प्रित कौर गिल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -