घरताज्या घडामोडीकिंडरगार्टनजवळ हेलिकॉप्टर अपघात; युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार

किंडरगार्टनजवळ हेलिकॉप्टर अपघात; युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार

Subscribe

युक्रेनची राजधानी कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरच्या अपघातात युक्रेनचे एक मंत्री, दोन लहान मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला आणि ते इमारतीला कसे धडकले या माहिती अद्याप असष्ट आहे.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरच्या अपघातात युक्रेनचे एक मंत्री, दोन लहान मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला आणि ते इमारतीला कसे धडकले या माहिती अद्याप असष्ट आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. (Ukraine Minister Among 16 Dead In Chopper Crash Near Kindergarten Says Cops)

मिळालेल्या माहितीनुसा, युक्रेनमध्ये एक हेलिकॉप्टर एका इमारतीला आदळले. त्यानंतर या हेलिकॉप्टरने लगेचच पेट घेतला. कीव या ठिकाणी हा अपघात झाला आहे. या अपघातात 16 जणांता मृत्यू झाला असून, युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिसर्स्की यांचाही या अपघातात मृत्यू झाला. या घटनेत २२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये १० लहान मुलांचा समावेश आहे. या जखमी मुलांवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

डेनिस मोनोस्टिर्स्की (गृहमंत्री), येवेन येनिन आणि युरी लुबोकोचिव अशा तीन मंत्र्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. बुधवारी पोलीसांनी या अपघाताबाबत माहिती दिली. युक्रेन पोलिसांचे प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी सांगितलं की सध्या १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे.

दरम्यान, ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला ते आपात्कालीन सेवेचा एक भाग होते. तसेच, कीवचे गव्हर्नर ओलेक्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा किंडरगार्टन अर्थात लहान मुलांच्या शाळेत लहान मुले आणि इतर कर्मचारी होते. या घटनेत २२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये १० लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी अपघात घडताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Air Quality : मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट; नागरिकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -