घरताज्या घडामोडीUkraine Russia War : युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मोदींच्या रणनितीचा वापर, पीयूष...

Ukraine Russia War : युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मोदींच्या रणनितीचा वापर, पीयूष गोयल यांचे वक्तव्य

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या प्रत्येक यंत्रणेला समाजातील विविध लोकांना कामात गुतंवले आहे. कारण आपले भारतीय सुरक्षितपणे येऊ शकतील. असे पीयूष गोयल म्हणाले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. गेल्या १४ दिवसांपासून हे युद्ध सुरु असून रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि बॉम्बचा मारा केला. युक्रेनमधून जगातील अनेक देशांनी आपल्या आपल्या नागरिकांना रेस्क्यू केलं आहे. भारतानेही विद्यार्थी आणि लोकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केलं आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांना ऑपरेशन गंगा अंतर्गत रेस्क्यू करण्यात आले आहे. दरम्यान युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढणं शक्य नव्हते पंरतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रणनितीमुळे विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आलं असल्याचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, २० हजारपेक्षा अधिक नागरिक ज्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या नागरिकांना युक्रेनमधून रेस्क्यू करण्यात आले आहे. नागरिकांना फक्त ३ आठवड्यामध्ये भारतात घेऊन येणं ही देशासाठी गर्वाची बाब आहे. देशात एक विश्वास निर्माण झाला आहे की, कोणत्याही संकटामधून भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला बाहेर काढू शकतील असे पीयूष गोयल म्हणाले आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः घेतली जबाबदारी

बचावकार्य सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ११ वेळा जगातील बड्या-बड्या नेत्यांशी संवाद साधला आहे. प्रत्येक रणनितीचा वापर करण्यात आले आहे. यामुळे आपल्या देशातील नागरिकांना मायदेशी आणण्यास यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष दिले. ८ उच्च स्तरीय बैठका घेतल्या, प्रत्येक बैठकीनंतर कठोर निर्णय घेतले. अशा प्रकारे प्रत्येक नागरिकाला भारतात आणण्यात आले आहे.

पीयूष गोयल म्हणाले की, संकटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिमेचे नेतृत्व केलं आहे. असे इतर कोणत्या देशात झाले नसेल. ज्यांनी एवढ्या गांभीर्याने आपल्या लोकांना पुन्हा देशात आणण्यासाठी प्रयत्न केले. आज शेवटच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात येत आहे. युद्धाच्या भागातून विद्यार्थी बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांनी सीमा रेषा ओलांडल्यावर रस्ते मार्गाने आणण्यात येणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या प्रत्येक यंत्रणेला समाजातील विविध लोकांना कामात गुतंवले आहे. कारण आपले भारतीय सुरक्षितपणे येऊ शकतील.


हेही वाचा : Ukraine Russia War : 9 बांगलादेशींना भारताने युक्रेनमधून केलं रेस्क्यू, पंतप्रधान शेख हसिनांनी मानले PM मोदींचे आभार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -