घरताज्या घडामोडीRussia Ukraine war: युद्ध रशिया आणि युक्रेनचं पण भारताच्या डोक्याला ताप, ही...

Russia Ukraine war: युद्ध रशिया आणि युक्रेनचं पण भारताच्या डोक्याला ताप, ही आहेत कारणे

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. या यु्दधामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणांवर अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने मोदी सरकारला येत्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कारण भारताने दूरदृष्टी ठेवत रशियाला उघडपणे विरोध केला नसून युक्रेनला मानवतेतून मदत करणेही सुरू ठेवले आहे.

त्यामागे अनेक परराष्ट्र धोरणं जरी असली तरी सद्यस्थितीत अनेक देशांनी रशियाला थेट विरोध दर्शवला असून युक्रेनला पाठींबा दिला आहे. रशिया आणि भारत यांची मैत्री त्यांच्यातील शस्त्रखरेदी जगजाहीर आहे. यामुळे रशियाला विरोध करणे भारताला परवडणारे नाही हे युक्रेनच नाही तर अमेरिकेलाही चांगले ठाऊक आहे. रशिया आणि भारताची ही मैत्री अमेरिकेच्या पोटशूळीचे मुख्य कारण आहे. यामुळे भारताला कोंडीत पकडण्याचा आणि जगासमोर भारत युक्रेनविरोधात असल्याचे चित्र दाखवण्याचा घाट अमेरिकेने घातला आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्याशी समतोल संबंध राखण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचपार्श्वभूमीवर नुकतीच रशियाचे अध्यक्ष व्लादोमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदेमीर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधत दोघांना सामंजस्याने यातून मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेवरही मोदींनी दोन्ही देशांना मदत करण्याची विनंती केली. त्यावेळीही भारताच्या भूमिकेवर अमेरिका आणि फ्रान्सने प्रश्नचिन्ह उभारले.

- Advertisement -

गुरुवारी क्वाड देशांच्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशिया आणि युक्रेन यु्ध्दावर टोलवाटोलवीची उत्तरे चालणार नाहीत असा इशारा नाव न घेता भारतावर साधला होता. कारण क्वाड देशांमध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाने रशियाविरोधात थेट भूमिका घेत आपण अमेरिकेसोबत असल्याचे म्हटले होते. तर बायडेन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने मतदानात सहभाग जरी घेतला नसला तरी युद्धाचेही समर्थन केले नव्हते. तसेच भारत माणुसकीच्या भावनेतून युक्रेनला मदत करत आहे. यामुळे यु्द्ध समाप्तीची मागणी करणाऱ्या देशांचेही तो समर्थन करताना दिसतोय.

यामुळे अमेरिका नाराज असून युरोपिय राष्ट्रांकडूनही भारताच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ज्याचा परिणाम अमेरिकाच नाही तर युरोपीय राष्ट्रांबरोबरील भारताच्या व्यावसाय़िक संबंधांवर होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -