घरताज्या घडामोडीUN General Assembly 2021: काश्मीर मुद्द्यावर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका नरमली

UN General Assembly 2021: काश्मीर मुद्द्यावर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका नरमली

Subscribe

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोगान यांनी पुन्हा एकदा काश्मीर विषयावर भाष्य केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत भाषण करताना यंदा मात्र त्यांचा काश्मीर मुद्द्यावरील भूमिका आता नरमली आहे. यंदाच्या ७६ व्या संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत यंदाही त्यांनी काश्मीरचा मुद्दा मांडला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करताना काश्मीर विषयावर उपाय शोधण्यासाठी आमचा पवित्रा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या ७४ वर्षांपासून काश्मिरचा मुद्दा सुटलेला नाही. संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून दोन राष्ट्रांमधील प्रश्न सुटायला हवा असेही मत त्यांनी मांडले आहे. पण यंदा मात्र अर्दोआन यांना संयुक्त राष्ट्रातील महासभेत काश्मिरच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका थोडी नरमलेली दिसली.

याआधी ७५ व्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मिर मुद्द्यावर खूपच गाजावाजा केला होता. तसेच काश्मिरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्याचाही मुद्दा त्यांनी मांडला होता. पण यंदा मात्र त्यांचे काश्मिरबाबतचे वक्तव्य खूपच सावध होते. यंदा त्यांनी सभेला संबोधित करताना अफगाणिस्तान, इस्राइल, सीरिया, लीबिया, यूक्रेन, अजरबैजान आणि चीनच्या बिगर मुस्लिमांचा मुद्दा मांडल्यानंतर काश्मिरचा मुद्दा मांडला. गेल्या वर्षीच्या सभेत त्यांनी बिगर मुस्लिमांचा मुद्दा मांडला नव्हता म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली होती.

- Advertisement -

अर्दोआनची नरम भूमिका

चीनमधील बिगर मुस्लिमांच्या अधिकाराशी संबंधित अर्दोआन यांनी म्हटले की, चीनमधील क्षेत्रीय अखंडतेमुळे बिगर तुर्की मुस्लिमांच्या अधिकारांसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य करताना सांगितले की अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समर्थनाची गरज आहे. अशा कठीण प्रसंगात अफगाणिस्तानच्या नागरिकांची मदत करणे गरजेचे आहे आणि तुर्की ही मदत कायम ठेवेल.

गेल्या वर्षीच्या सभेत बोलताना अर्दोआन यांचा काश्मिरबाबतचा पवित्रा वेगळा होता. काश्मिरचा संघर्ष दक्षिण आशियात शांती आणि स्थिरतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. सध्याचा ज्वलंत मुद्दा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा संपुष्टात आल्यानेच स्थिती आणखी बदलल्याचेही त्यांनी म्हटले होते. अर्दोआन यांनी म्हटले होते की, आम्ही काश्मिर मुद्द्यावर समाधानात्मक संवाद, यूएनचा प्रस्ताव आणि काश्मिरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्तीच्या प्रयत्नात आहोत. दक्षिण आशियात जर शांती, स्थिरता आणि संपन्नता आणायची असेल तर काश्मिर मुद्द्याला वेगळे करता येणार नाही. पण यंदा मात्र त्यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर यूएनच्या प्रस्तावाची आणि संवादाची गरज आहे. पण काश्मीरच्या लोकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टीचा उच्चार करण्यास मात्र ते विसरले. गेल्या वर्षी अर्दोआन यांनी काश्मिरचा मुद्दा मांडल्यानंतर पाकिस्तानने खूपच गाजावाजा केला होता. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही अर्दोआन यांच्या भाषणाची क्लिप शेअर करत त्यांचे आभार मानले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -