घरमहाराष्ट्रपुणेउद्धव ठाकरे यांच्याकडील भाषणाचे मुद्दे संपले, चंद्रकांत पाटलांचा टोला

उद्धव ठाकरे यांच्याकडील भाषणाचे मुद्दे संपले, चंद्रकांत पाटलांचा टोला

Subscribe

उद्धव ठाकरे यांच्याकडील भाषणासाठी लागणारे मुद्दे संपले आहेत आणि म्हणून ते एकच गोष्ट प्रत्येक भाषणात बोलत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना लगावण्यात आला आहे.

सध्या राज्यभरात वज्रमूठ या रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेची चर्चा होताना दिसून येत आहे. या सभेवर आता सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला आहे. या सभेमध्ये उद्घव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडील भाषणासाठी लागणारे मुद्दे संपले आहेत आणि म्हणून ते एकच गोष्ट प्रत्येक भाषणात बोलत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना लगावण्यात आला आहे. पुण्यात त्यांनी आज भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटूंबियांची भेट घेतली, तेव्हा ते बोलत होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा उल्लेख वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येतो, हे महत्त्वाचे आहे. माझ्या ज्या-ज्या वाक्यांची कॉन्ट्रोव्हर्सी केली गेली, त्या प्रत्येक वाक्याचा व्हिडीओ लावून माझे काय चुकले हे उद्धव ठाकरे यांनी मला सांगावे. ते जसे व्हिडीओ लावतात, तशा पद्धतीने त्यांनी माझ्या वक्तव्यांचा व्हिडीओ लावावा. त्यांच्याकडचे भाषणाचे मुद्दे संपले असल्याने ते सारखे तेच तेच बोलत आहेत, असा टोला पाटलांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

तसेच कालच्या सभेने काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते. आता ही महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे त्यांची ही वज्रमूठ त्यांचा अधिकार असला तरी ती वज्रमूठ ही भीतीतून आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

आज (ता. ०३ मार्च) भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे पुण्यातील दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. मागील आठवड्यात गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पण आजही अनेक भाजपचे नेते हे त्यांच्या कुटूंबियांच्या भेटीसाठी पुण्यात जात आहेत. गिरीश बापट हे कार्यकर्त्यांसाठी घरातील सदस्यासारखे होते, त्यामुळे आजही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे त्यांच्या कुटूंबियांची भेट घेत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – देश दंगलीमध्ये होरपळून टाकायचा आणि निवडणुका घ्यायच्या हाच भाजपाचा डाव – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -