घरदेश-विदेशय़ुपीतल्या दलित महिलेवर सुरूवातीला काही पशूंकडून बलात्कार, नंतर संपुर्ण सिस्टिमकडून बलात्कार

य़ुपीतल्या दलित महिलेवर सुरूवातीला काही पशूंकडून बलात्कार, नंतर संपुर्ण सिस्टिमकडून बलात्कार

Subscribe

उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेला सगळा प्रकारच अत्यंत वेदना देणारा असा आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेत महिलेवर बलात्कार करणारे हे पशूच होते. त्यांनी पहिल्यांदा महिलेवर बलात्कार केला, त्यानंतर संपुर्ण सिस्टिमने तिच्यावर बलात्कार केला. त्या महिलेच्या कुटुंबाला रातोरात अंत्यसंस्कार करायला लावणे हेच अत्यंत वेदनादायक आहे अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

- Advertisement -

दिल्लीच्या सफदरगंज हॉस्पिटलमध्ये या १९ वर्षीय दलित महिलेने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर हाथरस येथे या महिलेवर भल्या पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. पण पोलिसांनी आपली बाजू मांडताना कुटुंबानेच अशी मागणी केली होती असे स्पष्टीकरण दिले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करताना म्हटले आहे की हे संपुर्ण प्रकरण अत्यंत वेदनादाई असे आहे. केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे की, १९ वर्षीय दलित महिलेवरील बलात्कार हे समाज, देश आणि सरकार म्हणून अत्यंत वेदनादायी असे आहे. त्यांनी दोषी आरोपींना मृत्यूदंड व्हावा अशीही मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण ?

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचे कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -