घरताज्या घडामोडीबिग बींनी उचललं मोठं पाऊल, चाहत्यांनी केलं कौतुक!

बिग बींनी उचललं मोठं पाऊल, चाहत्यांनी केलं कौतुक!

Subscribe

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. ते नेहमी चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत असतात. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन चाहत्यांच्या प्रश्नांनाची उत्तर देखील देत असतात. त्यांच्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांनी आता असे काही पाऊल उचलले आहे ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जात आहे. अमिताभ बच्चन यांनी अवयव दान करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

‘मी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे अमिताभ बच्चन यांची ट्विट केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या निर्णयाचे कौतुक केले आहे तर काहींना तुम्ही अवयव दान करू शकत नाही असे म्हटले आहे.

- Advertisement -

एका चाहत्याने लिहिले आहे की, सर, तुम्हाला हिपेटाइटिस-बी होता. त्यामुळे तुम्ही इतर व्यक्तीला अवयव दान करू शकत नाहीत. तसेच तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट केलं आहे. अवयव दान करण्याचा निर्णय तुम्ही छान घेतला आहे. पण क्षमस्व. तुम्ही अवयव दान करू शकत नाहीत.

- Advertisement -

सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’चा १२ वा सीझन होस्ट करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच हा शो सुरू झाला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आयुष्मान खुरान मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अमिताभ बच्चन लवकरच ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


हेही वाचा – लवकरच अमेय वाघचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -