घरदेश-विदेशचपट्‍या नाकावरून चिडवल्याने भावाकडून बहिणीची हत्‍या

चपट्‍या नाकावरून चिडवल्याने भावाकडून बहिणीची हत्‍या

Subscribe

सात वर्षाच्या बहिणीने भावाला नाकावरून चिडवले म्‍हणून भावाने बहिणीला थेट जीवे मारले

प्रत्येक घरामध्ये असणाऱ्या भावंडांमध्ये वाद, भांडण, हेवेदावे हे होतच असतात. मात्र उत्‍तर प्रदेशच्या कासगंजमध्ये सात वर्षाच्या बहिणीने भावाला नाकावरून चिडवले म्‍हणून भावाने आपल्‍या सात वर्षाच्या या बहिणीला थेट जीवे मारल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. उत्‍तर प्रदेशच्या कासगंजमध्ये इयत्‍ता १० वी च्या वर्गात शिकत असलेल्‍या (१५) वर्षीय मुलाला त्‍याची बहीण चपट्‍या नाकावरून सतत चिडवायची. यावरून बहीण- भावांमध्ये सतत भांडणे व्हायची.

असा घडली घटना

सोमवारी भाऊ किशोर शाळेतून घरी आला तेंव्हा त्‍याची ७ वर्षांची बहीण त्‍याला नाकावरून चिडवायला लागली. चिडका आणि रागीट असणारा भाऊ घरी परतल्यावर चांगलाच चिडला होता. यावेळी घरात कोणीही नसल्‍याचे पाहून त्‍याने रागाच्या भरात बहिणीची हत्‍या करून टाकली. या प्रकारानंतर जेंव्हा मुलाची आजी घरात आली तेंव्हा ती मला चिडवत असल्‍याने मी तीची हत्‍या केल्‍याचे किशोरने आपल्या आजीला हा प्रकार सांगितला.

- Advertisement -

हा घडलेला प्रकार कोणाला कळू नये म्हणून मंगळवारी आजीने किशोरला शाळेत जाण्यास सांगितले. मरण पावलेली मुलगी शाळेत न पोहोचल्‍याने शाळेतून घरी फोन केला असता, या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहचली. किशोर शाळेतून घरी येईपर्यंत आजीने मुलाला घरातून गायब केले होते.

दरम्‍यान या घटनेची सत्‍यता पोलिसांना समजताच पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला असून या तपासात मुलाला रेल्‍वे स्‍टेशनवरून अटक करण्यात आली. पोलिसांनी मुलाला मुलीच्या हत्‍येबद्‍दल विचारले असता, मुलाने हत्‍येची कबुली दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -