उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गाचा 15 मीटरचा भाग खचला; 4200 चारधाम यात्री अडकल्याची भीती

यमुनोत्री धामपासून 25 किलोमीटर लांब असलेल्या यमुनोत्री महामार्गाचा 15 मीटरचा रस्ता खचल्याची माहिती समोर येत आहे. हा रस्ता खचल्यामुळे जवळपास 4200 चारधामयात्री अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. रस्ता खचल्याने अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून, केवळ लहान गाड्यांचीच वाहतूक सुरू आहे.

यमुनोत्री धामपासून 25 किलोमीटर लांब असलेल्या यमुनोत्री महामार्गाचा 15 मीटरचा रस्ता खचल्याची माहिती समोर येत आहे. हा रस्ता खचल्यामुळे जवळपास 4200 चारधामयात्री अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. रस्ता खचल्याने अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून, केवळ लहान गाड्यांचीच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे जानकीचट्टी ते बारकोट येथे बसने येणारे 1200 प्रवासी तर बारकोट ते जानकीचट्टीला जाणारे सुमारे 3 हजार प्रवासी बारकोट ते स्यानाचट्टी दरम्यान अडकल्याचे समजते.

बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे रानाचट्टी जवळीस यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाचा खालचा भाग खचला. त्यामुळे महामार्गावरील जवळपास 15 मीटर लांबीचा भाग खचला. महामार्गावरील रस्ता खचल्याने प्रवाशांनी भरलेल्या मोठ्या बसेसची वाहतूक बंद आहे. केवळ लहान वाहनांचीच वाहतूक सुरू आहे.

ज्या ठिकाणी महामार्गाच्या परिसरातील दरड कोसळली आहे. तेथे महामार्ग पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. कारण रस्ता अरुंद करण्यासाठी टेकडीवरून कठीण खडक कापण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. यासोबतच दरड कोसळून झालेल्या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामासाठी बराच कालावधी लागणार आहे.

या दुर्घटनेची जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दखल घेतली आहे. तसंच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, राणाचट्टीजवळील बारकोट विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक महामार्ग सुरळीत करण्यात व्यस्त आहे.

डोंगर कापून रस्ता रुंद करावा लागणार आहे. वरच्या बाजूने रस्ता खडकाळ असल्याने वेळ लागणार असल्याने मोठ्या वाहनांच्या ये-जा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत रस्ता तयार होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – चीनच्या नापाक कारवाया सुरूच; Pangong Lake वर बांधला आणखी एक नवा पूल