घरCORONA UPDATECoronaVirus: त्या आठ लसींवर WHO ची आशा टिकून; होऊ शकतो फायदा

CoronaVirus: त्या आठ लसींवर WHO ची आशा टिकून; होऊ शकतो फायदा

Subscribe

जागतिक आरोग्य संघटना WHO चे प्रमुख टेडरोज अधनोम गेब्रेयेसस यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे की, कोरोना विषाणूसाठी साधारण ७ ते ८ लसींची निवड करण्यात आली आहे. ज्यावर अधिक संशोधन केले जात आहे. आरोग्य संघटनेचे संचालक जनरल यांनी युएन इकोनॉमिक आणि सोशल काऊंसिलच्या व्हिडिओ संवादातून सांगितले की, कोरोनाला रोखण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या लसीसंदर्भात दोन महिन्यांपूर्वी १२ ते १८ महिन्यांसाठीचा अंदाज लावला जात होता. मात्र आता कोरोना झपाट्याने पसरू लागला असून त्यावरील संशोधनाचे कामही जलद गतीने केले जात आहे.

हेही वाचा – Lockdown Effect : महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला ४ कोटींचा दंड

- Advertisement -

काय म्हणाले संघटनेचे प्रमुख 

संघटनेच्या प्रमुखांनी माहिती दिली की, व्हायरसचे संशोधन आणि उपाय तसेच चाचण्या यांच्यासाी ४० देशांतील नेता, संघटना आणि बँकांनी एका आठवड्यात साधारण ६० हजार कोटी रुपये इतकी मदत दिली आहे. मात्र कोरोनासाठी बनवण्यात येणाऱ्या लसीसाठी ही रक्कम अपुरी पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. लसींवरील संशोधन जलद गतीने काम करण्यासाठी संघटनेला आणखी निधीची आवश्यकता आहे. लस बनवल्यानंतर त्याची निर्मितीही मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात ती लस पोहोचवावी लागणार असून त्यासाठी त्याची संख्याही जास्त असणार आहे. सध्या आमच्याकडे साधारण १०० लस बनवण्यात आलेले प्रयोग सादर झाले आहेत. त्यामध्ये ७ ते ८ परिणामकारक असल्याचे दिसून येत आहेत. या ७ ते ८ लसींच्या संशोधनावर अधिक काम सुरू आहे. परंतू संशोधनाच्या शेवटी कोणत्या लसीवर शिक्कामोर्तब केला जाईल, हे आता सांगणे कठिण आहे. लस शोधण्यासाठी तसेच ती पारखून घेण्यासाठी जगभरात ४०० हून अधिक शास्त्रज्ञांचा एक गट त्यावर काम करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -