घरदेश-विदेश'नैसर्गिक मृत्यू झाल्यास मुशर्रफ यांचा मृतदेह तीन दिवस चौकात लटकवा'

‘नैसर्गिक मृत्यू झाल्यास मुशर्रफ यांचा मृतदेह तीन दिवस चौकात लटकवा’

Subscribe

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष, लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, मुशर्रफ सध्या दुबईत आहेत. दुबई येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजे १७ डिसेंबर २०१९ रोजी पाकिस्तानच्या विशेष कोर्टाने त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्यात दोषी ठरवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यातील कोर्टाचे काही निकालपत्र समोर आले आहेत. शिक्षा होण्याआधी मुशर्रफ यांचा मृत्यू झाल्यास इस्लामाबादच्या डी-चौकात त्यांचा मृतदेह तीन दिवस लटकवून ठेवण्यात यावा, असे निर्देश त्या निकालपत्रात देण्यात आले आहेत.

काय म्हटले आहे निकालपत्रात?

पाकिस्तानच्या विशेष कोर्टाने याप्रकरणी १६७ पानी निकालपत्र जारी केले आहे. गुन्हेगाराला पकडून आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करावेत आणि कायद्यानुसार शिक्षेची अंमलबजावणी करावी, अशी तंबी कोर्टाने दिली आहे. निकालपत्रात मुशर्रफ यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचा मृतदेह खेचून आणावा आणि तीन दिवस लटकवून ठेवावा, असे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंड


दरम्यान, मुशर्रफ यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत, असा द्यावा त्यांनी केला आहे. राजकीय हेतूने सर्व आरोप आपल्या विरोधात करण्यात आले आहेत. आरोपी आणि वकिलांना आपली बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नाही, असे मुशर्रफ म्हणाले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी आणीबाणी लागू केली होती. आणीबाणी दरम्यान पाकिस्तानच्या मुख्य कोर्टाच्या न्यायाधीशांनाही अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला जात होता. पाकिस्तानच्या विशेष कोर्टात २०१३ सालापासून याप्रकरणी खटला सुरु होता. दोन दिवसापूर्वी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -