घरदेश-विदेशAssembly Election 2021: पश्चिमबंगाल निवडणुकीदरम्यान हिंसाचार; TMC आणि BJP कार्यकर्ते आमने-सामने

Assembly Election 2021: पश्चिमबंगाल निवडणुकीदरम्यान हिंसाचार; TMC आणि BJP कार्यकर्ते आमने-सामने

Subscribe

पाचव्या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सुरू आहे. उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगालमधील सहा जिल्ह्यांमध्ये ४५ जागांवर हे मतदान सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कित्येक मतदान केंद्रांवर कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. चौथ्या टप्प्यात झालेल्या निवडणूकीनंतर निवडणूक आयोग अधिक सतर्क झाले आहे. असे असतानाही टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मीनाखान येथे बॉम्ब हल्ल्याची घटना घडली असून एक टीएमसीचा कार्यकर्ता जखमी झाल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. यासह उत्तर २४ परगणामध्ये तीन ठिकाणी हिंसाचार झाला असल्याची माहिती मिळतेय. नदिया जिल्ह्यातही भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बारासात, मीनाखान आणि कामरहाटी या भागात निवडणुकीदरम्यान हिंसाचार झाला आहे. या ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. बारासात मतदारसंघात भाजपाने मतदार केंद्राच्या १५० मीटर अंतरावर बंदोबस्त केला असल्याचे सांगितले जात आहे, तर मीनाखानमध्ये ISF कार्यकर्त्यांवर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यासोबतच कामरहाटीमध्ये सॅनिटायझर वाटप करण्याच्या निमित्ताने मतदान केंद्रावर गर्दी करण्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात सितलकुची भागात कऱण्यात आलेल्या गोळीबारानंतर आयोगाने पाचव्या टप्प्यात सतर्क राहून निवडणूक दरम्यान अधिक सुरक्षा वाढवली आहे. पाचव्या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसेचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान सकाळी ७.०० वाजेपासून ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सहा जिल्ह्यांतील एकूण ४५ जागांवर मतदान पार पडणार असून या सर्व मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान याअगोदर पार पडलंय तर अजून १५९ जागांवर मतदान बाकी आहे.पाचव्या टप्प्यातील सगळे मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देखील सतर्क झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या पाचव्या टप्प्यात दुपारी १.३४ वाजेपर्यंत ५४.६७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -