Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी उत्तराखंडमध्ये होमगार्डकडून अनोख्या अंदाजात 'वाहतूक कंट्रोल'; व्हिडीओ तुफान व्हायरल

उत्तराखंडमध्ये होमगार्डकडून अनोख्या अंदाजात ‘वाहतूक कंट्रोल’; व्हिडीओ तुफान व्हायरल

Subscribe

अनेकदा वाहतुक पोलीस वेगवेगळ्या भुमिकेत वाहतुक हाताळताना पाहायला मिळते. बऱ्याचदा वाहन चालकांना योग्य नियमावली समजवण्यासाठीही या पद्धतीचा वाहतूक पोलीस वापर करतात. अशातच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनेकदा वाहतुक पोलीस वेगवेगळ्या भुमिकेत वाहतुक हाताळताना पाहायला मिळते. बऱ्याचदा वाहन चालकांना योग्य नियमावली समजवण्यासाठीही या पद्धतीचा वाहतूक पोलीस वापर करतात. अशातच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उत्तराखंडमधील वाहतुक पोलीस अनोख्या भुमिकेत वाहतूक हाताळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. (viral traffic police video dehradun home guard jogendra kumar controlling traffic in unique way)

जोगेंद्र कुमार असे या होमगार्डचे नाव आहे. जोगेंद्र कुमार आपल्या अनोख्या शैलीने वाहतूक नियंत्रित करताना दिसत आहोत. डान्स करताना वाहतूक हाताळणाऱ्या या होमगार्डचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. होमगार्ड जोगेंद्र कुमार सध्या डेहराडूनच्या सिटी हार्ट हॉस्पिटलजवळ तैनात आहे. जोगेंद्र कुमार यांच्या वाहतूक हातळण्याचे डीजीपी अशोक कुमार यांनीही अशा प्रकारे वाहतूक नियंत्रणावर त्यांचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, होमगार्ड जोगेंद्र कुमार कसे नाचत आणि ट्रॅफिक मॅनेज करत आहेत हे दिसत आहे. याआधी इंदूरचे ट्रॅफिक पोलीस रणजीत सिंग देखील आपल्या अनोख्या स्टाइलने डान्स करताना ट्रॅफिक कंट्रोल करताना दिसले आहेत.


हेही वाचा – ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ हे मुख्यमंत्र्यांचे अभिवचन घोषणेत विरले; अंबादास दानवेंचा निशाणा

- Advertisement -
- Advertisement -
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -