VIDEO : धावत्या एक्सप्रेसमधून हिसकावली महिला पोलिसाची बॅग

धावत्या एक्सप्रेसच्या डब्यातून एका महिला पोलिसाची बॅग हिसकावल्याची घटना समोर आली आहे.

watch thief caught on cam snatching passenger bag from a moving train
धावत्या एक्सप्रेसमधून हिसकावली महिला पोलिसाची बॅग

सध्या सोशल मीडियावर एका धावत्या एक्सप्रेसचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक चोर एक्सप्रेसच्या डब्यात चढून एका महिलेच्या हातातील बॅग हिसकावताना दिसत असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी  मुंबईतला व्हिडिओ असल्याचे तर्कवितर्क लावले आहेत. मात्र, हा व्हिडिओ मुंबईतला नसून भोपाळमधला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या चोरातचे नाव दानिश असून त्याचे वय २४ वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या चोरांनी चक्क महिला पोलिसाची बॅग हिसवाली आहे.

नेमके काय घडले?

महिला पोलीस अलाम खान या २३ सप्टेंबरला दिल्लीहून भोपाळला निघाल्या होत्या. सकाळी शताब्दी एक्सप्रेस ६ वाजण्याच्या सुमारास भोपाळ या स्थानकावर येत असताना एक्सप्रेसचा वेग देखील कमी झाला. एक्सप्रेसचा वेग कमी झाल्याचे पाहून दानिश या आरोपींने एक्सप्रेसमध्ये चढत दरवाजावर उभ्या असणाऱ्या महिला पोलिसाची बॅग हिसकावली आणि एक्सप्रेसमधून उडी घेतली. सुदैवाने महिला पोलिसाला काही झाले नसून त्या सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे महिला पोलीस अलाम खान या एक्सप्रेसच्या C4 या डब्यातून प्रवास करत होत्या. त्या दरम्यान, ही घटना घडली आहे. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले असून यामध्ये महिला पोलिसासोबत तिचा सहकारी देखील दिसत आहे.


हेही वाचा – २६ जानेवारीला अपाचे, चिनूकची पहिली परेड