घरताज्या घडामोडी'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Subscribe

उत्तर भारतातील मैदानी भागात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिवाळा आता हळूहळू संपत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमान 30 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. तसेच, हिमालयीन प्रदेशात हिमवृष्टी आणि पाऊस पडत आहे.

उत्तर भारतातील मैदानी भागात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिवाळा आता हळूहळू संपत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमान 30 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. तसेच, हिमालयीन प्रदेशात हिमवृष्टी आणि पाऊस पडत आहे. आज पहाडी राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (weather update moderate rainfall snowfall western himalayas region delhi weather)

हिमाचल प्रदेशात चार दिवस हवामान कोरडे राहील

- Advertisement -

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 12 फेब्रुवारी 2023 पासून पश्चिम हिमालयात हलका, मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, लडाखच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, हिमाचल प्रदेशात पावसाने हजेरी लावल्यानंतर पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार आहे.

उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता

- Advertisement -

पुढील दोन दिवस अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. पंजाब, बंगाल, सिक्कीममध्ये काही तास धुके असू शकते. गुजरात किनारपट्टीजवळ ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घसरण होऊ शकते. उत्तराखंडच्या काही भागात हलका पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच राहणार

जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव सुरू राहू शकतो. पश्चिम विक्षोत्र पश्चिम हिमालयातून पूर्वेकडे सरकत आहे. एक प्रेरित चक्रीवादळ पंजाब आणि लगतच्या भागावर आहे. 14 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयात नवे वेस्टर्न डिस्टर्बन्स पोहोचण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये तापमानात घट होईल

स्कायमेट हवामान विभागाच्या अहवालानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागांसह संपूर्ण राजस्थानच्या तापमानात घट होऊ शकते. वायव्य आणि मध्य भारतातील बहुतांश भागात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त असू शकते.


हेही वाचा – अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला रामराम; फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -