घरताज्या घडामोडीढगफुटी म्हणजे काय ?

ढगफुटी म्हणजे काय ?

Subscribe

पावसाळा सुरू झाला कि कुठे ना कुठे ढगफुटीच्या घटना घडतात. पण पाऊस आणि ढगफुटी म्हणजे काय, ती का होते. हे बऱ्याच जणांना माहित नसतं. आज आपण याबदद्लच जाणून घेणार आहोत.

ढगफुटी ही (Cloud Burst) निसर्गाची एक अशी अवस्था आहे ज्यात कमीत कमी वेळेत सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होते. पण त्याबरोबरच विजाही कडाडतात आणि गाराही पडतात.

- Advertisement -

त्यातही ढगफुटी ही बहुतेकवेळा एकाच ठिकाणी होते.

ढगफुटीमध्ये काही मिनिटातच दोन सेमी पाऊस कोसळतो. पण जर पावसाचा हाच वेग दोन तास राहीला तर २० सेमीपर्यंत पाऊस कोसळू शकतो.

- Advertisement -

ढगफुटीच्या घटना या प्रामुख्याने डोंगराळ व पर्वतीय भागात होतात. या भागात काळेढग मोठ्या प्रमाणावर आकाशात एकत्र येतात. एखाद्या टाकीचा तळ जर फुटला तर ज्या वेगाने पाणी खाली कोसळते तशाच वेगाने ढगफुटीत पाऊस कोसळतो. आकाशातील ढग फुटतो आणि त्यात साचलेले पाणी जमिनीवर कोसळतं.

ढगफुटीच्या पावसात मोठे थेंब व प्रचंड वेग असतो. डोंगरमाथ्यावर ढगफुटी झाल्यास आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने जमिनीचे पाणी शोषण्याचं काम थांबत. यात गावं, शेती पाण्याखाली जातात.

ढगफुटीच्या पावसात वाऱ्याचा वेगही कधी ताशी दिडशे ते दोनशे किमी वेग घेतो. या वादळी वाऱ्यामुळे विमान अपघातही होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -