घरदेश-विदेशसावधान! लाखो भारतीयांच्या व्हॉट्सअॅप नंबरची हॅकर्सकडून होतेय ऑनलाइन विक्री

सावधान! लाखो भारतीयांच्या व्हॉट्सअॅप नंबरची हॅकर्सकडून होतेय ऑनलाइन विक्री

Subscribe

भारतासह जगभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढतेय. यात हॅकर्स सतत नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवे क्राईम करत आहेत. यात आता जगातील कोट्यावधी युजर्सचा व्हॉट्सअॅप नंबर आणि खासगी डेटा चोरी करत तो ऑनलाईन विक्री केल्याची घटना समोर आली आहे. हॅकर्सनी जगभरातील 487 दशलक्ष व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा हॅक करुन तो इंटरनेटवर विकला आहे. यातील 61.62 लाख फोन नंबर भारतीयांचे आहेत. या डेटामध्ये फोन नंबर, देशाचे नाव, एरिया कोडचा समावेश आहे, हा सर्व डेटा अॅक्टिव्ह युजर्सचा आहे.

19 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत 84 देशांमधील नागरिकांची माहिती आहे. देशांनुसार नंबरच्या श्रेणी बनवून विकल्या जात आहेत. हॅकरने सोबतच्या मेसेजमध्ये लिहिले की, आज मी या व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा बेस विकत आहे. हा 2022 चा नवीन डेटा आहे. म्हणजेच तुम्ही ते विकत घेतल्यास, तुम्हाला नवीन अॅक्टिव्ह मोबाइल युजर्स मिळतील.

- Advertisement -

आता जवळपास ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप नंबरच्या डेटा बेसची सायबर गुन्हेगार विक्री करत असून, यासाठी ग्राहकांचा शोध सुरू आहे. रिपोर्टनुसार, एका प्रसिद्ध हॅकिंग कम्युनिटी  फोरमने जाहिरात पोस्ट केली आहे. या जाहिरातीत हॅकर्सने त्यांच्याकडे ४८.७ कोटी व्हॉट्सअ‍ॅप नंबर्स असल्याचा दावा केला आहे. हा डेटा बेस वर्ष २०२२ चा आहे. या डेटा बेसमधील सर्व व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू आहेत.

इजिप्तमधील सर्वाधिक, भारत 25 व्या क्रमांकावर

84 देशांमध्ये सर्वाधिक म्हणजे 4.48 कोटी युजर्सचा डेटा हॅक करण्यात आला आहे. यानंतर इटलीतील 3.23 कोटी, अमेरिकेतील 3.23 कोटी, सौदी अरेबियातील 2.88 कोटी आणि फ्रान्समधील 1.98 कोटी युजर्सचा डेटा हॅक झाला आहे. हॅक झालेल्या युजर्सच्या यादीत भारत 25 व्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

काही सायबर तज्ञांच्या अंदाजानुसार, हे काम स्क्रॅपिंग हॅकिंग तंत्राच्या साहाय्याने केले आहे. या तंत्रात मोठ्या संख्येने ऑनलाइन प्लॅटफॉर्म युजर्सची माहिती प्रोग्रामद्वारे चोरून ती स्टोर करून ठेवतात. अशा प्रकारची कृती व्हॉट्सअॅप कंपनीच्या युजर्सच्या अटींचे उल्लंघन आहे, परंतु व्हॉट्सअॅप स्वतःच ते थांबवू शकले नाही.

बचाव : यापासून वाचण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी बदलून ‘काँटॅक्ट ओन्ली’ करू शकता.यातून जे लोक तुमच्या कॉन्टेक्टमध्ये आहेत तेच तुमच्यासोबत बोलू शकतात किंवा कनेक्ट राहू शकतात.

हॅक केलेल्या सर्व व्हॉट्सअॅप नंबरचा सर्वात मोठा उपयोग मार्केटिंगमध्ये होऊ शकतो. विशेषत: वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर युजर्सना त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी करू शकतात. पण सर्वात मोठा धोका फिशिंग आणि फ्रॉडचा आहे.

या नंबरद्वारे युसर्जच्या ओळखीचा दुरुपयोग करून दुसऱ्याची फसवणूक केली जाऊ शकते. एका महिन्यात सुमारे 200 कोटी युजर्स व्हॉट्सअॅपवर सक्रिय असतात. 48.7 कोटी युजर्सचा डेटा हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात, 25 टक्के युजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. विविध सायबर सुरक्षा संस्थांनी काही सँपल नंबर व्हेरिफाय केले जे बरोबर असल्याचे आढळले. अशा मोठ्या हॅकवर मेटाने कोणतेही विधान जारी केलेले नाही.


हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -