घरताज्या घडामोडीसंतापजनक! धावत्या बसमध्ये कंडक्टरनेच केला महिलेवर बलात्कार

संतापजनक! धावत्या बसमध्ये कंडक्टरनेच केला महिलेवर बलात्कार

Subscribe

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे महिला प्रवासीवर धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेश गेले काही दिवस बलात्कार, खून, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी वाराणसीतील रामनगर भागात एका १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला करुन तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्यावर बसच्या कंडक्टरनेच बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी कंडक्टरला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; दिल्लीमध्ये राहणारी महिला उत्तर प्रदेशातील मथुरा येथे धावत्या बसमधून प्रवास करत होती. डबल डेकर बसमधून लखनऊहून दिल्लीला जात होती. त्याच दरम्यान, बसमध्येच कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. महिलेनेच स्वतः ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून या घटनेची माहिती दिली आणि आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करून आरोपी कंडक्टरला अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रिया आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या – सीबीआय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -