Covid-19 Treatments : कोरोनावर आता दोन नव्या पद्धतीने होणार उपचार; WHO ने दिली मान्यता

WHO च्या कोरोनावरील उपचार पद्धती नियमितपणे क्लिनिकल चाचण्यांमधील नवीन डेटाच्या आधारे अपडेट केल्या जातात.

WHO approves two new covid 19 treatments
कोरोनावर आता दोन नव्या पद्धतीने होणार उपचार ; WHO ची मान्यता

जगभरात नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी कोरोनावर उपचार करण्यासाठी दोन नव्या उपचार पद्धतींना मान्यता दिली आहे. ज्यामुळे गंभीर आजार आणि संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखता येतील शिवाय लसीकरणासह एक शस्त्र म्हणून काम करतील. ओमिक्रॉनमुळे जगभरातील सर्वाधिक रुग्णालये भरू शकतात. तर मार्चपर्यंत निम्म्या युरोपात हा संसर्ग पसरला जाईल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.

ब्रिटीश मेडिकल जर्नल द बीएमजे मधील त्यांच्या शिफारसीमध्ये, WHO च्या तज्ञांनी म्हटले की, गंभीर किंवा अति गंभीर कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह वापरल्या जाणाऱ्या बॅरिसिटिनिब औषधामुळे मृत्यूदर कमी होतोय. शिवाय रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज देखील कमी लागतेय.

तज्ज्ञांनी सिंथेटिक अँटीबॉडी उपचार सोट्रोविमॅबची शिफारस देखील केली आहे. कोरोना नसलेल्या परंतु हॉस्पिटलायझेशनचा सर्वाधिक धोका असलेल्यांसाठी या औषधांची शिफारस केली आहे. यामध्ये वृद्ध, इम्युनोडेफिशियन्सी असलेले लोक किंवा मधुमेहासारखे जुनाट आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे.रूग्णालयात दाखल होण्याचा धोका नसलेल्या लोकांसाठी सोट्रोविमॅबचे फायदे क्षुल्लक मानले गेलेत. तर WHO ने देखील ओमिक्रॉनसारख्या नवीन व्हेरिएंटविरोधात त्याची प्रभावीता अजूनही अनिश्चित असल्याचे म्हटले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये गंभीर आजारी रूग्णांसाठी कॉर्टिकोस्टिरॉइड्स औषधापासून सुरुवात झाली. मात्र कोरोनावर आत्तापर्यंत फक्त तीन इतर उपचारांनाच WHO ने मान्यता दिली आहे.

कॉर्टिकोस्टिरॉइड्स स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि सामान्यतः गंभीर रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरतेय. याशिवाय Tocilizumab आणि Sarilumab औषधांना WHO ने जुलैमध्ये मान्यता दिली आहे. या औषधांमुळे
SARS-CoV-2 विषाणूमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर होणाऱ्या हल्ल्याला रोखता येतेय.

WHO ने सिंथेटिक अँटीबॉडी उपचार रेजेनेरॉनला सप्टेंबरमध्ये मान्यता दिली होती. तसेच सोट्रोविमॅबचा वापर कोणत्या रूग्णांवर केला जाऊ शकतो याची मार्गदर्शक तत्वे ठरवली होती. WHO च्या कोरोनावरील उपचार पद्धती नियमितपणे क्लिनिकल चाचण्यांमधील नवीन डेटाच्या आधारे अपडेट केल्या जातात.


भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी? बोरिस जॉन्सनवर राजीनाम्याचा दबाव