भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी? बोरिस जॉन्सनवर राजीनाम्याचा दबाव

जॉन्सन यांचे मुख्य खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन असतानाही अनेक लोकांना पार्टीसाठी मेल केले होते. मात्र यावेळी देशात कोरोना प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी होती.

Odds Favour Indian-Origin Rishi Sunak as Next UK PM Amid Mounting Pressure on Boris Johnson to Resign
भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधान पदी? बोरिस जॉन्सनवर राजीनामा देण्याचा दबाव

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीदरम्यान ब्रिटनमध्ये त्यांनी लॉकडाऊन लागू केला. मात्र या लॉकडाऊनदरम्यान खुद्द पंतप्रधान जॉन्सन यांनीच पंतप्रधान कार्यालय डाउनिंग स्ट्रीट येथे ड्रिंक पार्टीचे आयोजन केले होते. या मुद्द्यावरून ब्रिटनमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढत आहे. विरोधी पक्षांकडून बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी करत आहेत. अशातच ब्रिटनमधील आघाडीची सट्टा कंपनी बेटफेअर ने दावा केला की, अडचणीत सापडलेले बोरिस जॉन्सन लवकरचं पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक बसू शकतात.

बेटफेअरने पुढे म्हटले की, मे 2020 मध्ये 57 वर्षीय बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान कार्यालय डाउनिंग स्ट्रीट येथे एका पार्टीचे आयोजन केले होते. यामुळे केवळ विरोधी पक्षांकडूनचं नाही तर त्य़ांच्या स्वत:च्या पक्षातील लोकांकडूनही राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यामुळे जॉन्सन यांच्यानंतर ऋषी सुनक हे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. यानंतर लिझ ट्रस (परराष्ट्र मंत्री) आणि त्यानंतर मायकेल गोव्ह (कॅबिनेट मंत्री) यांच्या क्रमांक लागतो. या शर्यतीत माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांचाही समावेश आहे.

जॉन्सन यांचे मुख्य खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन असतानाही अनेक लोकांना पार्टीसाठी मेल केले होते. मात्र यावेळी देशात कोरोना प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी होती. जॉन्सन यांनी याप्रकरणी पश्चाताप व्यक्त करत पहिल्यांदाच या पार्टीत हजेरी लावल्याचे मान्य केले. यावर जॉन्सन म्हणाले की, त्यांना वाटले की ही पार्टी त्यांच्या कार्याशी संबंधित कार्यक्रमांच्या कक्षेत आहे. मात्र पार्टीसाठी पाठवलेले मेल सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली.


Kiran Mane : इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप