घरताज्या घडामोडीcorona Variant : डेल्टा आणि ओमिक्रॉनमधून नवा व्हेरीएंट ? WHO च्या अभ्यासात...

corona Variant : डेल्टा आणि ओमिक्रॉनमधून नवा व्हेरीएंट ? WHO च्या अभ्यासात खुलासा

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी होत असतानाच, मुंबईसह अनेक राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या कमी झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाचा एक नवा व्हेरीएंट समोर आला आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचे सारखेच या नव्या व्हेरीएंटचे रूप आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हायरसच्या एकत्रीकरणातून हा व्हायरस निर्माण झाल्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार या व्हायरसबाबतची कल्पना आधीच होती, असे म्हटले आहे. दोन्ही व्हायरस वेगाने संक्रमण करत असल्यानेच हा व्हायरस डोकेदुखी ठरू शकतो असाही प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

- Advertisement -

ओमिक्रॉन आणि डेल्टाचा रिकॉम्बिनेंट व्हायरस फैलावत आहे. दोन्ही व्हायरस एकत्रित होऊन संसर्गाचा धोका अधिक असल्याची शक्यता डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिक मारिया वान करखोव यांनी ट्विट केले आहे. तसेच व्हायरसचा प्रसार वेगाने होण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. या व्हायरसला आम्ही ट्रॅक करत असून याबाबतची चर्चाही सध्या सुरू आहे. एक व्हायरॉलॉजिस्टचे ट्विट या वैज्ञानिकाने केले आहे. या दोन्ही व्हायरसच्या एकत्रीकरणातून व्हायरस निर्माण झाल्याचे पक्के पुरावे सापडले आहेत. जानेवारी २०२२ मध्येच फ्रांसमध्ये या व्हायरसचे संक्रमण सुरू झाले होते. डेनमार्क आणि नेदरलॅंडमध्येही हा व्हायरस आढळला आहे. पण हा व्हायरस घातक झाल्याचे पुरावे अद्यापही सापडले नाहीत.

डब्ल्यूएचओ च्या अहवालात काय ?

– अहवालानुसार जीनोम आणि प्रोफाईलचे व्हायरस डेनमार्त आणि नेदरलॅंडमध्ये सापडले आहेत. एकाच म्युटेशनमधून या व्हायरसची उत्पत्ती झाली आहे. रिकॉम्बिनेशनमधूनच ही प्रकरणे समोर आली आहेत.
– या व्हेरीएंटवर डब्ल्यूएचओ लक्ष ठेवून आहे. व्हेरीएंट अतिशय वेगाने संसर्ग करताना समोर आले आहे.
– सुरूवातीला डब्ल्यूएचओने संयुक्त व्हेरीएंट येण्याची गोष्ट फेटाळली होती. पण एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ शकते ही गोष्ट मात्र डब्ल्यूएचओने स्विकारली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -