घरताज्या घडामोडीWHOने गंभीर कोरोना रुग्णांवर डेक्सॅमेथासोन औषध वापरण्याचा दिला सल्ला

WHOने गंभीर कोरोना रुग्णांवर डेक्सॅमेथासोन औषध वापरण्याचा दिला सल्ला

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जगात कोरोनाबाधितांचा आकडा ९१ लाखांहून अधिक आहे. तर यापैकी ४ लाख ७४ हजारांहून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहे. तसेच ४९ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून डेक्सॅमेथासोन या औषधाच्या उत्पादन प्रक्रियेत झपाट्याने वाढ करण्यावर भर देण्यात आला आहे. वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर आता गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी डेक्सॅमेथासोन औषध वापर करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

- Advertisement -

डेक्सॅमेथासोन या औषधाने रुग्णाचे प्राण वाचवता येत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा सल्ला दिला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात डेक्सॅमेथासोन या औषधाचे संशोधन करण्यात आले. डेक्सॅमेथासोन हे औषध काही ठराविक मात्रेमध्ये विविध प्रकारच्या एॅलर्जी, अस्मा, कॅन्सर अशा रोगांवर वापरले जाते. जवळपास १० दिवस या औषधावर संशोधन केल्यानंतर व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णाचा प्राण वाचवता येऊ शकतो असे सिद्ध झाले आहे. हे निष्कर्ष प्राथमिक स्वरुपाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्राथमिक स्तरावर या औषधाची चाचणी ज्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू होते अशा २१०० कोरोना रुग्णावर करण्यात आली. त्याव्यतिरिक्त ज्यांना कोरोनाचे उपचार दिले जाणे अपेक्षित आहे अशा ४३०० संशयीतांवर चाचणी करण्यात आली. यासंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालकांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडले. ते म्हणाले की, ‘औषधात कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्याची क्षमता आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. त्यामुळे औषधाचे उत्पादन वाढवण्याचे आणि ते जागतिक स्तरावर सर्वाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे पुढील आव्हान आहे.’ अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे औषध यशस्वी ठरल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी ब्रिटन सरकार आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि इतर लोकांचे अभिनंदन केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेने भारतीय आयटी व्यावसायिकांना दिला झटका, एच १-बी व्हिसा केला निलंबित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -