घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा कोरोना होत नाही, याचा पुरावा नाही - WHO

कोरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा कोरोना होत नाही, याचा पुरावा नाही – WHO

Subscribe

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर ज्या व्यक्ति बऱ्या होतात. त्यांच्यासाठी इम्युनिटी पासपोर्ट किंवा रिस्क फ्री सर्टिफिकेट्स देण्याचा विचार काही देशांकडून करण्यात येत होता. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने यावर आक्षेप घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर जे लोक बरे झालेत आणि त्यांची अँटिबॉडिज (रोग प्रतिकारशक्ती) विकसित झालेली आहे, अशा लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होत नसल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे WHO ने सांगितले आहे.

WHO ने म्हटले आहे की, जगातले काही देश इम्युनिटी पासपोर्ट देण्याच्या विचारात आहेत. जेणेकरुन बरे झालेले रुग्ण प्रवास करु शकतात किंवा कामाला जाऊ शकतात. मात्र एकदा कोरोनातून रुग्ण बरा झाला, म्हणजे तो सुरक्षित आहे असे नाही. उलट अशा व्यक्तिमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा अधिक धोका असतो. कारण संबंधित व्यक्ती कोणतीही काळजी न घेता प्रवास करु शकणार आहे.

- Advertisement -

चिली देशाने मागच्या आठवड्यात कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांना हेल्थ पासपोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्यात कोरोना विरोधात लढणारी रोग प्रतिकारक शक्ती विकसित झाली असेल तर त्यांना कामावर पुन्हा जाण्यासही परवानगी देण्यात येत आहे.

WHO ने मात्र या पर्यायाचा विरोध केला आहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र दिल्यास लोक सार्वजनिक नियमांचे उल्लंघन करतील आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी आखलेल्या नियमावलीचा भंग होईल. ज्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका उद्भवू शकतो. सध्यातरी कोरोनाच्या अँटिबॉडिजवर संशोधन होत आहे, त्यामुळे याबाबत आताच काही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे WHO ने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -