घरदेश-विदेशIND vs PAK : पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजर करणाऱ्या काश्मिरींवर राग का?...

IND vs PAK : पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजर करणाऱ्या काश्मिरींवर राग का? मेहबुबा मुफ्तींचा सवाल

Subscribe

ICC T20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्तानी क्रिकेट संघाने भारतीय संघाचा पराभव केला. मोठ्या गॅपनंतर भारतीय संघ-पाकिस्तानचा पराभव करेल अशी अपेक्षा होती. मात्र भारतीय संघाला खराब फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे सामना गमावावा लागला. भारतीय संघाच्या पराभवामुळे देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र जम्मू काश्मीरमधील अनेक भागांत पाकिस्तानच्या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. फटाक्यांची आतबाजी करत काही कश्मिरी लोकांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद घेतला. मात्र पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील काही लोकांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानच्या विजयाच्या आनंद साजरा करणाऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मेहबुबा मुफ्ती यांनीही पाकिस्तानच्या विजयाचे समर्थन करत भारतातील संतप्त लोकांनी विराट कोहलीकडून काहीतरी शिका असा सल्ला दिला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी यासंदर्भात एक ट्वीट पोस्ट केलं आहे. या ट्वीटमध्ये मुफ्ती यांनी, “पाकिस्तानच्या विजयाच्या आनंद साजरा करणाऱ्या कश्मिरींविरोधात राग का? देशातील गद्दारांना गोळी मारा अशा घोषणा दिल्या जातायत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर किती लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला, हे कोणीही विसरु शकत नाही. हा विजय विराट कोहलीसारखा योग्य भावनेने घ्या.. विराटने सर्वप्रथम पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले, असं मुफ्तींनी ट्वीटमध्ये लिहिलेय. या ट्वीटसोबतच त्यांनी विराट कोहलीचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट पाकिस्तानी फलंदाज रिझवानसह काही बोलताना दिसतोय.

- Advertisement -

रविवारी दुबईत पार पडलेल्या भारत- पाकिस्तान टी २० विश्वचषक सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. २००७ ते २०१६ या काळात भारत विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. त्यामुळे आयसीसी विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे.

- Advertisement -

“पाकिस्तानचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या घटना अत्यंत लज्जास्पद”

मात्र पाकिस्तानच्या विजयाचे भारतात होणाऱ्या सेलिब्रेशनवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यात काही राजकीय मंत्र्यांनी देखील पाकिस्तानच्या विजयाचे समर्थन करणाऱ्यांविरोधात टीका केली आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी फटाके फोडून पाकिस्तानच्या विजयाचा भारतात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. यासोबतच अनिल वीज यांनी हे कृत्य करणाऱ्यांविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे.

अनिल वीज यांनी ट्वीट करत लिहिले की, “पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या विजयानंतर भारतात फटाके फोडणाऱ्या लोकांचा डीएनए भारतीय असू शकत नाही. त्यामुळे घरात लपून बसलेल्या गद्दारांपासून सावध राहा.”

 

GMC आणि SKIMS मेडिकलच्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

तर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याप्रकरणी काही GMC आणि SKIMS वैद्यकीय महाविद्यालयातील काही  विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी ही माहिती सांगितली आहे.


India vs Pakistan : मॅच भारत -पाकिस्तानची, चर्चा मात्र हसन अलीच्या पत्नीची

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -