घरदेश-विदेशतलाक नंतर महिन्याभराच्या उपासमारीमुळे 'तिचा' मृत्यू

तलाक नंतर महिन्याभराच्या उपासमारीमुळे ‘तिचा’ मृत्यू

Subscribe

फोनवर तलाक आणि महिनाभर अन्नपाण्याविना खोलीत डांबून ठेवले. महिन्याभराच्या उपासमारीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील बरेली येथे घडली आहे.

तलाक!तलाक!तलाक! नवऱ्याने फोनवर तिला तलाक दिला. त्यानंतर महिनाभर तिला एकाच खोलीत अन्नपाण्याविना डांबून ठेवल्याने उपासमारीमपुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील बरेली येथे घडली आहे. रझिया असे या महिलेचे नाव असून महिनाभरापूर्वी तिला नवऱ्याने फोनवर तलाक दिला. त्यानंतर तिला जबरदस्तीने एका खोलीत डांबून ठेवले गेले. महिनाभराच्या काळात तिला अन्न-पाणी न मिळाल्याने रझियाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचारादरम्यान तिचा मंगळवारी मृत्यू झाला. रझियाला सहा वर्षाची मुलगी देखील आहे. हुंड्यासाठी नवऱ्याकडून रझियाचा छळ सुरू असायचा. शिवाय, तिला, मारहाण देखील केली जायची असा आरोप देखील रझियाच्या बहिणीने केला आहे. तसेच रझियाला पहिल्यांदा तलाक दिला गेला. त्यानंतर तिला खोलीत डांबून ठेवण्यात आल्याची माहिती देखील रझियाच्या बहिणीने दिली आहे.

तलाकनंतर महिनाभराची उपासमार

महिन्याभरापूर्वी उत्तरप्रदेशातील बरेली येथील रझियाला नवऱ्याने फोनवर तलाक दिला. त्यानंतर तिला खोलीत डांबून ठेवण्यात आले. महिन्यानंतर जेव्हा रझियाची सुटका करण्यात आली तेव्हा तिची परिस्थिती खूपच नाजूक होती. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या रझिया पूर्णपणे खचली होती. तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रझियाच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. पण, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप रझियाच्या बहिणीने केला आहे. उपचारादरम्यान रझियाचा मृत्यू झाला. रझियाच्या पतीचे यापूर्वी देखील एक लग्न झाल्याची  माहिती आता समोर येत आहे. त्यानंतर देखील रझियाचा छळ सुरूच होता.

- Advertisement -

चपाती करपल्याने तलाख!

क्षुल्लक कारणावरून तलाक देण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. माहुबामध्ये केवळ चपाती करपली म्हणून तलाक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील महिलांना स्काईप, व्हॉट्सअॅपवर तलाक दिल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील काही प्रकरणे ही सध्या न्यायप्रविष्ठ आहेत.

तलाकप्रश्नी सरकार गंभीर

दिवसेंदिवस तलाकच्या घटना वाढत आहेत. फोन, मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर करून महिलांना तलाक दिला जात आहे. या प्रश्नाचा सध्या सरकार गांभीर्याने विचार करत आहे. डिसेंबर २०१७मध्ये केंद्र सरकारने तलाकच्या मुद्यावर लोकसभेत विधेयक देखील मांडले होते. लोकसभेत तलाक संबंधित विधेयकाला मान्यता मिळाली असून राज्यसभेच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -