घरदेश-विदेशयेथे बाळात हवे तसे गुण टाकून मिळतील; चीनचे शास्त्रज्ञ

येथे बाळात हवे तसे गुण टाकून मिळतील; चीनचे शास्त्रज्ञ

Subscribe

पालकांना हवे तसे मुल मिळवून देण्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. डीएनएमध्ये बदल करून पाहिजे तसे मुल मिळवून देण्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

आपण जन्म देणारा मुलगा सुदृढ असला किंवा त्याच्यामध्ये ठराविक गुणधर्म असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. आतापर्यत मुल कसा होणे हे मानवाच्या हातात नव्हते. यामुळे अनेकदा ग्रामीण विभागात मुलांची बळी घेतल्याचे प्रकारही भारतात उघडकीस आले होते. विज्ञानात दिवसां दिवस प्रगती होत चाचली आहे. याच प्रगतीचा परिणाम म्हणजे येत्या काळात तुम्हाला होणारे मुलात तुमच्या आवडीचे गुण टाकून मिळणार आहेत. चीनच्या एका शास्त्रज्ञाने हा दावा केला आहे. त्यामुळे आता जगाचे लक्ष या संशोधनाकडे वळले आहे. या संशोधनात बाळाचा रंग, त्याचा स्वभाव बदलू शकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. जेनेटिकली मॉडिफिकेशन (जनूकीय रचनेत बदल) या तंत्राने ही गोष्ट शक्य झाली आहे. असा बदल करुन जगातील पहिल्या बाळाला जन्म दिल्याची बातमी चीनच्या काही वृत्तपत्रांनी दिली आहे. असे संशोधन करणारा चीन पहिलाच देश बनला आहे.

असे करण्यात आले संशोधन

चीनमध्ये नुकतेच जुळ्या बाळांना या पद्धतीने जन्म देण्यात आला. या जुळ्यांच्या डीएनएमध्ये बदल करण्यात आला.  एचआयव्ही ग्रस्त आईने जन्म दिलेले बाळांना एचआव्ही पासून वाचवण्यास येथील शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. डीएनएमध्ये केलेल्या बदलावामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनामुळे येत्या काळात पालक आपल्या बाळाचे केस, डोळे, चेहेरा, त्वचा आणि स्वभाव ठरवू शकणार आहेत. हे जुळे बाळ सुदृढ असल्याचे शास्ज्ञज्ञांनी सांगितले आहे.

- Advertisement -

इतर शास्त्रज्ञांचे मत 

या संशोधनावर इतर शास्त्रज्ञांनीही आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते डीएनएमध्ये केलेले बदल फार काळ टिकत नाहीत. असे बदल शरीराला अपायकारक असतात. असे बदल केल्यास येणाऱ्या पिढीला त्याचा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारचे संशोधनासाठी फार वेळ द्यावा लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -