घरक्रीडाWPL Auction: कधी बॉयकट केला, तर कधी मुलगा बनून खेळली, १६ व्या...

WPL Auction: कधी बॉयकट केला, तर कधी मुलगा बनून खेळली, १६ व्या वर्षी भारतीय टीममध्ये एन्ट्री

Subscribe

शेफालीचा हा प्रवास सहज सोपा नसून अनेक संघर्षानंतर तिने हा पल्ला गाठला आहे.

महिला प्रीमियर लीग २०२३ साठी लिलाव सुरू असून अनेक खेळाडू मालामाल झाल्या आहेत. शेफाली वर्माला दिल्ली कॅपिटलने जोन कोटीमध्ये खरेदी केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण शेफालीचा हा प्रवास सहज सोपा नसून अनेक संघर्षानंतर तिने हा पल्ला गाठला आहे.

- Advertisement -

 

प्रीमियर लीगच्या लिलावाद्वारे भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. बीसीसीआयने या लिलावात ४४८ महिला खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले आहे. ज्यात २७० भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात भारताच्या खेळाडूंवर अक्षरश पैशांचा वर्षाव केला जात आहे. भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघाची कर्णधार शेफाली वर्मावर दिल्ली कॅपिटलने दोन कोटींची बोली लावून तिला आपल्या चमूत सामील केले आहे. हरियाणातील रोहतक जिल्ह्यापासून सुरू झालेला शेफालीच्या या प्रवासावर जगभऱातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत.

- Advertisement -

शेफालीचा खडतर, संघर्षमय प्रवास

शेफाली वर्मा हीचे नाव भारतीय महिला क्रिकेट संघातील चर्चिले जाणारे नाव आहे. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच टीम इंडीयामध्ये जागा मिळाल्यानंतर शेफालीने अंडर १९ टी २० वर्ल्ड कपसाठी विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. पण एक वेळ अशी होती की शेफालीला चक्क मुलगा बनून खेळावे लागले होते.

शेफाली राहत असलेल्या रोहतकमध्ये त्यावेळी मुलींसाठी क्रिकेट अॅकेडमी नव्हती. तसेच मुलांच्या क्रिकेट अॅकेडमीमध्ये खेळण्यास शेफालीला परवानगीही नाकारण्यात आली होती. त्यानंतर शेफालीचे वडील संजीव वर्मा यांनी शेफालीचे केस मुलांप्रमाणे कापले त्यामुळे अनेकजण तिला मुलगा समजू लागले. नंतर अनेक वर्ष ती मुलांच्या क्रिकेट अॅकडमीमध्ये मुलगा बनून खेळत होती.

एका मुलाखतीत शेफालीने तिला कराव्या लागलेल्या संघर्षाबदद्ल सांगितले होते. सुरुवातीच्या काळात शेफालीबरोबर मुल खेळायला तयार नसत. मुलीबरोबर खेळणे त्यांना कमीपणाचे वाटायचे. पण २०१३ मध्ये हरियाणात क्रिकेटर सचिन तेंडुलकर शेवटचा रणजी सामना खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर शेफालीने कधीही मागे वळून बघितले नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -