घरदेश-विदेशनेपाळमध्ये येति एअरलाइन्सचं विमान कोसळले, 68 प्रवाशांचा जागीच मृत्यू

नेपाळमध्ये येति एअरलाइन्सचं विमान कोसळले, 68 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Subscribe

काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारे येति एअरलाइन्सचे एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.

नवी दिल्लीः नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे येति एअरलाइन्स(Yeti Airlines)चे विमान कोसळले. या विमानात 68 प्रवासी होते. त्यातील 68 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे येति एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची माहिती नेपाळी माध्यमांकडून मिळाली आहे. विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते.

काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारे येति एअरलाइन्सचे एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. येति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. अपघाताबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दुःख व्यक्त केलंय. नेपाळमधील पोखरा येथे यती एअरलाइन्सचे विमान कोसळले असून ७२ प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानात भारतीय नागरिक सुद्धा असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर दुर्घटना अत्यंत दुःखदायी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय तसेच इतर नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

- Advertisement -


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या छायाचित्रे आणि व्हिडीओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या विमान अपघाताबाबत अजून माहिती मिळालेली नाही. अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.

- Advertisement -

अपघातग्रस्त विमानात 5 भारतीय होते
येति एअरलाइन्सच्या क्रॅश झालेल्या विमानातील 68 प्रवाशांपैकी 10 प्रवासी परदेशी नागरिक होते. ज्यामध्ये 5 भारतीयही होते. येति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की, विमानात दोन बाळांसह 10 परदेशी नागरिक होते. विमानात 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, एक आयरिश, 2 कोरियन, 1 अर्जेंटिनी आणि एक फ्रेंच नागरिक होते. भारताचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नेपाळमधील विमान अपघातातील लोकांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. सिंधिया म्हणाले की, माझ्या संवेदना आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत. येति एअरलाइन्सचे हे विमान मध्य नेपाळमधील पोखराच्या जुन्या आणि नवीन विमानतळादरम्यान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषाला आग लागली असून, बचाव कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. सर्व बचाव यंत्रणा आग विझवणे आणि प्रवाशांना वाचवणे यावर भर देत आहे.

खराब हवामानामुळे नव्हे तर तांत्रिक बिघाडामुळे अपघात
नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाने दावा केला आहे की, येति एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे नव्हे तर तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. पायलटने एटीसीकडून लँडिंगची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले. पोखरा ATC मधून उतरण्यासाठी ओकेसुद्धा सांगण्यात आले. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, लँडिंगच्या काही वेळापूर्वी विमानात ज्वाळा दिसत होत्या. त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला, असे म्हणता येणार नाही.

पोखरा विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द
पोखरा येथे रविवारी येति एअरलाईन्सचे विमान कोसळल्यानंतर पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते टेकनाथ सितौला यांनी सांगितले की, पोखरा विमानतळावरील सर्व उड्डाणे आजसाठी रद्द करण्यात आली आहेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -