पंकजा मुंडे भाजपवर नाराज; फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला दर्शवली गैरहजेरी

dcm devendra fadnavis beed visit Pankaja Munde postponed beed tour

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशात त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणार की नाही यावरही चर्चा रंगतायत. यावर पंकजा मुंडेंनीही मौन बाळगल्याने शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहे. अशात बीडमधील पाटोदा तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. संत वामन भाऊंच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजिक या सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गहिणीनाथ गडावर येणार आहेत. तसेच पंकजा मुंडेही याठिकाणी हजेरी लावणार होत्या.

मात्र पंकजा मुंडे आता गहिनीनाथ गडावर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी अचानक आपला गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीच्या चर्चांमुळे त्या पक्षावर नाराज असल्याचेही म्हटले जात आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आमंत्रण आहे. फडणवीसांचा यानिमित्ताने महिन्याभरात दुसऱ्यांदा बीड दौरा येणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच बीड दौरा होता. मात्र मुख्यमंत्र्यांचाही हा दौरा आता रद्द झाला आहे. तर धनंजय मुंडे रुग्णालयात असल्याने तेही या कार्यक्रमास हजर राहणार नाहीत. 22 वर्षातील ही पहिलीच वेळ आहे जी धनंजय मुंडे गहिनीनाथ गडावर जाणार नाही. तर पंकजा मुंडे यांनीही गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द केला आहे.

पंकजा मुंडे याही दरवर्षी गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी जात असतात. मात्र त्यांनी पहिल्यांदाच दौरा रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आता फक्त देवेंद्र फडणवीस हे एकटेच जाणार आहेत.


अमेरिकेची आर बोनी ग्रॅबिएल ठरली ‘मिस युनिव्हर्स 2022’ ची विजेती