घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धानिसर्गाशी नाते सांगणारा राजाराम कदम यांचा बाप्पा

निसर्गाशी नाते सांगणारा राजाराम कदम यांचा बाप्पा

Subscribe

कदम यांचे कुटुंबिय दहा वर्षांपासून ठाणे येथे घरगुती गणेशोत्सव साजरा करीत आहेत. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सालाबादप्रमाणे गणेशमूर्ती शाडूची असून ती हरणावर विराजमान झालेली आहे. तसेच देखाव्यातून पर्यावरण राखण्याचा संदेश दिला आहे. मुर्तीच्या मागे जंगलाची सजावट पूर्णपणे कागद फुले आणि पाने यांपासून तयार केली आहे. या पूर्ण सजावटीस केवळ ५०० रुपये एवढा खर्च आला असल्याचे कदम यांनी सांगितले.
गणपती ही बुद्धीची देवता असून लोकांना जंगल संवर्धनाची बुद्धी मिळो, असा संदेश या माध्यमातून कदम कुटुंबियांना द्यायचा आहे. जंगल टिकले तरच मानवजात या पृथ्वीतलावर तग धरु शकते, हे सत्य अधोरेखित करण्यासाठी गणेशोत्सव हे प्रबोधनाचे माध्यम त्यांनी वापरले आहे.

Rajaram kadam home ganpati

- Advertisement -

 

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

- Advertisement -

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -