Eco friendly bappa Competition
घर संपादकीय दिन विशेष जीवाणुशास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग

जीवाणुशास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग

Subscribe

अलेक्झांडर फ्लेमिंग हे वैद्यक आणि जीवाणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलीन हे सूक्ष्म जीवाला मारणारे पहिले प्रतिजैविक ठरले. स्टॅफिलोकोकाय ऑरासखेरीज न्यूमोनिया, घटसर्प, स्कार्लेट ज्वर यांचे रोगजीवाणूही पेनिसिलीन नष्ट करते असे त्यांनी सिद्ध केले.

अलेक्झांडर फ्लेमिंग हे वैद्यक आणि जीवाणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलीन हे सूक्ष्म जीवाला मारणारे पहिले प्रतिजैविक ठरले. स्टॅफिलोकोकाय ऑरासखेरीज न्यूमोनिया, घटसर्प, स्कार्लेट ज्वर यांचे रोगजीवाणूही पेनिसिलीन नष्ट करते असे त्यांनी सिद्ध केले. पेनिसिलिनच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १८८१ रोजी लाँचफील्डफार्म, स्कॉटलँड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाऊडन मूर येथे झाल्यावर ते १८९४ मध्ये किल्मारनॉक अकॅडेमी येथे दाखल झाले. (Article on Bacteriologist Alexander Fleming)

१८९५ साली लंडन येथे आपल्या मोठ्या भावासोबत राहण्याकरिता स्थलांतरित होऊन त्यांनी रिजंट स्ट्रीट पॉलिटेक्निकमधून मूलभूत शिक्षण पूर्ण केले. काही काळ जहाजांवर नोकरी केल्यावर शिष्यवृत्ती आणि आपल्या काकांकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्याने त्यांनी सेंट मेरीज मेडिकल स्कूलमध्ये १९०१ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तेथूनच त्यांना १९०८ साली लंडन युनिव्हर्सिटीतील सर्वोत्तम वैद्यकीय विद्यार्थी म्हणून सुवर्णपदकाचा बहुमान मिळाला.

- Advertisement -

सुरुवातीला त्यांना शल्यचिकित्सक व्हावयाचे होते, परंतु सेंट मेरीज हॉस्पिटलमधील रोगप्रतिबंधक विभागातील प्रयोगशाळांमधील तात्पुरती स्थितीमुळे त्यांचे भविष्य जीवाणुशास्त्राच्या बॅक्टेरियोलॉजी नवीन क्षेत्रात आहे याची खात्री पटली. तेथे त्यांना जीवाणुशास्त्रज्ञ आणि प्रतिरक्षाशास्त्रज्ञ सर अल्मरोथ एडवर्ड राइट यांच्या लस उपचार पद्धतीची कल्पना वैद्यकीय उपचारात क्रांतिकारक दिशा देतात असे त्यांना आढळले. तिथे शिकवत असताना आणि रोग्यांवर उपचार करत असताना त्यांना असेही आढळले की, कित्येक रोगी औषधोपचार सुरू नसतानाही बरे होताहेत.

यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, माणसाच्या शरीरात काही रोगप्रतिकारकशक्ती नैसर्गिकरीत्याच असावी. पहिल्या महायुद्धात (१९०४-०८) त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय तुकडीत काम केले. युद्धावरून परतल्यावर सेंट मेरीजमध्ये शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर त्यांनी संशोधन केले. त्यांची १९४३ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली व १९४४ मध्ये त्यांना सर हा किताब प्रदान करण्यात आला. अशा या महान जीवाणुशास्त्रज्ञाचे ११ मार्च १९५५ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -