घरसंपादकीयदिन विशेषनिबंधकार, कोशकार वासुदेव गोविंद आपटे

निबंधकार, कोशकार वासुदेव गोविंद आपटे

Subscribe

निबंधकार, कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा आज स्मृतिदिन. वासुदेव आपटे हे मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्‍यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते. त्यांचा जन्म १२ एप्रिल १८७१ रोजी खानदेशातील धरणगाव याठिकाणी झाला. कोलकाता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा १८९६ मध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते नागपूरच्या ‘हिस्लॉप’ कॉलेजात एक वर्ष फेलो होते.

वा. गो. आपटे त्यानंतर पुण्यातही काही काळ शिक्षक होते. ‘अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र’ (१८९९) हे त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म या विषयावरील ‘बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ मध्ये तो प्रसिद्ध झाला. काही काळ त्यांनी अलाहाबाद येथील ‘मॉडर्न रिव्ह्यू’त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘ज्ञानप्रकाशा’च्या संपादनाचे काम केले.

- Advertisement -

१९०६ रोजी त्यांनी ‘आनंद’ हे मुलांचे मासिक सुरू केले. त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ठ्या यशस्वी करून दाखविला. ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ (१९१०),‘लेखनकला आणि लेखनव्यवसाय’ (१९२५), ‘मराठी शब्दरत्नाकर’ (१९२२), ‘मराठी शब्दार्थ चंद्रिका’ (१९२२), इत्यादी विविध विषयांवरील चोवीस-पंचवीस पुस्तके व बाल वाङ्मय विभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली. अशा या महान कोशकाराचे २ फेब्रुवारी १९३० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -