घरसंपादकीयओपेडडार्क एनर्जी, डार्क मॅटर आणि शिवत्व!

डार्क एनर्जी, डार्क मॅटर आणि शिवत्व!

Subscribe

महाशिवरात्री हा आध्यात्मिक उन्नती साधण्याचा मार्ग अनेकांना वाटतो, तसेच काळीकुट्ट अंधारी रात्र ही वातावरण आणि हवामान अभ्यासासाठी एक पर्वणी आणि सुवर्णसंधीदेखील आहे. सुलभ, साधी आणि स्वत:पासून ब्रम्हांडाचा ठाव घेण्याचा मार्ग दाखविणारी सहजता असलेली सनातन किंवा हिंदू संस्कृती आहे. स्वत:ला अतिप्रगत मानणारे पाश्चिमात्य लोक आज याच जीवनपद्धतीचे आचरण करू लागले आहेत. ब्रह्मदेव म्हणजे निर्माता किंवा जनक, विष्णूदेव म्हणजे व्यवस्थापक संचालक, तर भगवान शिव म्हणजे जुने, अनावश्यक, टाकाऊ नष्ट करणारा विनाशक म्हणून वर्णन आहे.

‘बॉयलॉजिकल मशिन्स’ (मानवी शरीर) मध्ये चेतना निर्माण करणार्‍या अनाकलनीय आत्म्याचे ध्येय प्राप्त करत बंधनमुक्त होण्याचा प्रवास म्हणजे ‘शिवत्व’! ‘गूढ अज्ञाता’ची व्याप्ती ‘ज्ञात’च्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे. डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीचे महत्व अनन्यसाधारण आहे. एसी कॅबिनमध्ये घमेंडी फिलॉसॉफीकल पोपटपंची गप्पा मारणार्‍या ‘ब्रम्हज्ञानींनी’ हे ‘अधिकृतपणे स्वयंघोषितमान्य’ केले तरी शास्त्राचा अभ्यास खर्‍या अर्थाने पुढे जाईल. चर्या (बाह्य उपासना), क्रिया (अंतरंगातून मॉरॅलिटीने सेवा), योग (ध्यान) आणि ज्ञान हे ‘शिवत्व’(शिवाचे स्वरूप) प्राप्त करण्याचे चार मार्ग! जगातील विविध धर्म, पंथ यांची नाळ आधुनिक विज्ञानाशी जोडलेली आहे.

‘गॉड’ (GOD) हा शब्द म्हणजे जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर! त्रिशूळातील तीन शुळ तळाशी एकत्र येतात तसेच निर्माण, व्यवस्थापन आणि नष्ट होत पुन्हा नवनिर्मिती हेच सृष्टीचक्र आहे. शरीराच्या पेशीपासून ब्रह्मांडातील विशालकाय तारे आणि ग्रहगोलांनी बनलेल्या अगणित आकाशगंगांपर्यंत सर्व काही निर्माण, वाढ आणि विस्तार होत नष्ट होत शून्य (शिन्य) म्हणजे शिवतत्त्वात विलीन होणे या तीनच भौतिकशास्त्रीय प्रक्रियेत ‘महाकाल टाइमस्केल’वर घडतात.

- Advertisement -

महाशिवरात्री हा आध्यात्मिक उन्नती साधण्याचा मार्ग अनेकांना वाटतो, तसेच काळीकुट्ट अंधारी रात्र ही वातावरण आणि हवामान अभ्यासासाठी एक पर्वणी आणि सुवर्णसंधीदेखील आहे. सुलभ, साधी आणि स्वत:पासून ब्रम्हांडाचा ठाव घेण्याचा मार्ग दाखविणारी सहजता असलेली सनातन किंवा हिंदू संस्कृती आहे. स्वत:ला अतिप्रगत मानणारे पाश्चिमात्य लोक आज याच जीवनपद्धतीचे आचरण करू लागले आहेत. ब्रह्मदेव म्हणजे निर्माता किंवा जनक, विष्णूदेव म्हणजे व्यवस्थापक संचालक, तर भगवान शिव म्हणजे जुने, अनावश्यक, टाकाऊ नष्ट करणारा विनाशक म्हणून वर्णन आहे. असे असले तरी हवा तो ‘देव’ मानण्याचे स्वातंत्र्य-विविधता आणि ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशा वैश्विक कल्याणकारी भावाने विकसित होण्यास संपूर्ण वाव देणारी ही जगण्याची पद्धतीदेखील आहे.

काळोखात संपन्नतेची जाणीव : महाशिवरात्रीच्या काळ्याभोर रात्रीत व दिवसा लख्ख सूर्यप्रकाशात लोक शिवआराधना करतात ते सद्बुद्धी, नॉलेज, विझडम देत संपन्नता अशी ओळख असलेल्या हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून! हिरवा रंग म्हणजे प्रकाशाची तरंगलांबी (वेव्ह लेंग्थ) ही जवळपास ४९५ नॅनो मीटर ते ५७० नॅनो मीटर म्हणजेच कंप्रता (फ्रिक्वेन्सी) ही जवळपास ५२६ ते ६०६ टेरा हर्टझ होय. गंमत म्हणजे मानवाला भीतीदायक व राक्षसी वाटणारा आणि प्रकाश वर्णपटातील सर्व रंग शोषून घेणार्‍या काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे लोक टाळतात. श्रद्धा-अंधश्रद्धा वादाच्या पलिकडे जात विचार करता खरंतर अंधारात विलीन होण्याआधी मानवी जीवनाची समृद्ध हिरवळ फुलविण्याचा संदेश आणि काळोखात संपन्नतेची जाणीव महाशिवरात्री देत नाही का?

- Advertisement -

डार्क मॅटर : शास्त्रज्ञांनी यापूर्वी कधीही पाहिलेल्या गोष्टींपेक्षा डार्क मॅटर (गडद पदार्थ) आणि डार्क एनर्जी (गडद ऊर्जा) हे पूर्णपणे वेगळे आहे. आतापर्यंत मानवाला एवढेच माहीत होते की विश्व संचालनालयाची, गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकत्व, कमकुवत अणुशक्ती आणि मजबूत अणुशक्ती या केवळ चारच ऊर्जा किंवा शक्ती भौतिकशास्त्रानुसार कार्यरत आहेत. विश्व समजून घेताना गणितीय मांडणीत शास्त्रज्ञांच्या लक्षात येऊ लागले की ‘कुछ तो गडबड है!’

‘गॅलेक्सी क्लस्टर’ म्हणजे हजारो आकाशगंगा, गरम प्लाझ्मा आणि प्रचंड अदृश्य डार्क मॅटर विश्वातील सर्वात मोठे असे वस्तूमान असते, जे स्वत:च स्वत:च्या गुरुत्वाकर्षणाने एकत्र बांधलेले राहते. पृथ्वीपासून सरासरी ९९ एमपीएससी म्हणजे ३२१ दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर, हजारापेक्षा जास्त आकाशगंगा असलेले कोमा क्लस्टर (अ‍ॅबेल १६५६) आहे.

१९३३ साली आकाशगंगांच्या कोमा नावाच्या क्लस्टरचा अभ्यास करताना अज्ञात पदार्थांचे वर्णन करण्यासाठी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्विस-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ फ्रिट्झ झ्विकी यांनी ‘गहाळ वस्तुमान’ (मिसिंग मास) शोधून काढले तेच हे डार्क मॅटर! जून २०२० मध्ये अनपेक्षित निष्कर्षासह इटलीतील XENON१T या प्रयोगात डार्क मॅटर डिटेक्ट झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.

डार्क मॅटर हे विश्वातील घटकांना एकमेकांपासून दूर असले तरी बांधून ठेवते. गंमत म्हणजे डार्क मॅटर हे कणांनी बनलेले असले तरी ते प्रकाश शोषत नाहीत, परावर्तित करत नाहीत किंवा उत्सर्जित करत नाहीत हे अद्भुत आहे. त्यामुळे डार्क मॅटरचा शोध घेताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वापर करून डार्क मॅटर कसे असते हे मुळी दिसूच शकत नाही. मग डार्क मॅटर शोधायचा कसा? तर डार्क मॅटरच्या अस्तित्वामुळे वस्तूंवर काय काय परिणाम होतो हे आपण प्रत्यक्षपणे पाहू व अभ्यासू शकतो. कृष्ण विवर (ब्लॅक होल्स) सारख्या करामतीतून डार्क मॅटर विश्वातील गुरुत्वाकर्षणाच्या फरकावरून ओळखले जाऊ शकते. याशिवाय श्वेत बटू तारे, स्फोट झाल्यानंतर मृत तार्‍यांचे अवशेष, न्यूट्रॉन स्टार डार्क मॅटरचा परिणाम आणि पर्यायाने अस्तित्व दर्शवितात.

डार्क एनर्जी : वस्तुमान आणि ऊर्जा यांचे एकमेकांत रूपांतर होते हे १९०५ साली आईन्स्टाईनने गणितीय पद्धतीने सांगितले होते. मग उत्पत्ती झालेली संकल्पना म्हणजे डार्क एनर्जी!

बिग बँग थियरी व विरोधाभास : डार्क एनर्जी हे रहस्यमय शक्तीला दिलेले नाव आहे. आपले विश्व सतत विस्तारत आहे. बिग बँग थिअरीनुसार, विश्वाच्या विस्ताराची सुरुवात एका विशिष्ट बिंदूवर एका कणाच्या स्फोटाने झाली. गंमत ‘बिग बँग’ स्फोटानंतर एकमेकांना कुठेही धडका न मारता अगदी शांतपणे विश्व विस्तार होत असतानाच वेग कमी व्हायला हवा, पण अगदी नियमाच्या विरुद्ध जात विश्वविस्तार होताना वेगही सतत वाढतो आहे हे विशेष आहे! याच कोड्याचे उत्तर शोधताना शोध लागला तो डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीचा! डार्क एनर्जी ही विश्वातील विविध घटकांना एकमेकांपासून दूर लोटण्याचे काम करते आणि यामुळेच ब्रम्हांड विस्तार वेग वाढतो.

सीबीआयएन या संस्थेच्या रिपोर्टनुसार विश्वाच्या पदार्थ-ऊर्जेच्या रचनेच्या २७ टक्के भाग हा अज्ञात अशा ‘डार्क मॅटर’ने बनलेला आहे. तसेच संपूर्ण विश्वाचा ६८ टक्के भाग ‘डार्क एनर्जी’ने बनलेला आहे. थोडक्यात संपूर्ण ब्रम्हांड म्हणजे गुण आणि अद्याप न समजलेल्या एकंदर ९५ टक्के डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी आहे. गंमत म्हणजे आपल्याला ‘ब्रम्हज्ञान’ झाले आहे असा आभास निर्माण होत घमेंड करीत असलेल्या मानवाला सामान्यत: दृश्यमान आणि ज्ञात असलेल्या मॅटर (पदार्थ) आणि एनर्जी (ऊर्जा) केवळ आणि केवळ ५ टक्के इतकी आहे. ‘टाईम स्केल’ वर ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर पोहचेपर्यंत मानवी आयुष्य संपून शिवत्व म्हणजे शून्यात विलीन होऊन जाते हा ‘महाकाल’ महिमा आहे.

अर्धनारीनटेश्वर, डार्क एनर्जी आणि डार्क मॅटर ‘तत्वज्ञान’ : अर्धनारीनटेश्वर हे स्त्री आणि पुरुष या दोन्ही तत्त्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे प्रतीक आहे. एकत्र बांधून ठेवणारे डार्क मॅटर आणि परस्परांपासून दूर लोटणारी डार्क एनर्जी या दोघांचे विश्वातील अजब काँबिनेशन हे अर्धनारीनटेश्वरासारखेच आहे. थोडक्यात, आपल्याला इतकेच कळले आहे जे कळायचे बाकी त्या ‘गूढ अज्ञाता’ची व्याप्ती ‘ज्ञात’च्या तुलनेत किमान १९ पटीने जास्त आहे. ‘शिवत्व’ प्राप्त करण्याच्या प्रवासात डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीवरचा अंधार येत्या शतकात दूर होत नवा प्रकाश मानवी सभ्यतेला प्राप्त होईल हा विश्वास आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -