शिवसेना-धनुष्यबाणावरील निर्णयानंतर दापोलीत ठाकरे अन् शिंदे गटात राडा

shinde group and thackeray group cried storm in dapoli after election commission decision shiv sena name and symbol

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह बहाल केलं आहे. मात्र हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का आहे. कारण एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे, याचदरम्यान केंद्रीय निवडणुक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर आता सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. मात्र केंद्रीय निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्याने राज्यभरात अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोकणातील दापोलीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगश कदम यांच्या समर्थकांवी ठाकरे गटाच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक कार्यकर्ते पोलिसांना न जुमानता कार्यालयात जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.

शिंदे गटाच्या या आक्रमक कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु होता अशी माहिती मिळत आहे. कार्यालयाच्या ताबा घेण्यावरूनचं ठाकरे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळत आहे. कदम यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरु होता.


खचू नका आणि जिद्दही सोडू नका; उद्धव ठाकरेंनी समर्थकांना दिला विश्वास