घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होइल श्रीअनंतु । ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥
त्या संवादाचे निरूपण जगदीश्वर स्वतः करतील व ती गोष्ट निवृत्तिदास ज्ञानदेव सांगतील.
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥
ज्ञानोबाराय म्हणतात – कोणत्या प्रकाराने अर्जुनाने शंका केली, ते ऐका मग अर्जुन म्हणतो- देवा, कृपासागरा, तुम्ही जे बोलला, ते मी लक्षपूर्वक ऐकिले.
तेथे कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म आणि कर्ता ही विचार करून पाहता उरतच नाहीत. श्रीअनंता, हेच जर आपले निश्चित मत असेल,
तरी मातें केवीं श्रीहरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसी ना महाघोरीं । कर्मीं सुतां ॥
तर मग, हृषीकेशा,‘पार्था, तू संग्राम कर’ असे मला का सांगता? या भयंकर कर्मात मला घालताना तुम्हाला संकोच कसा वाटत नाही?
हा गा कर्म तूंचि अशेष । निराकरिसी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी ॥
हे पहा सर्व कर्माचा तुम्ही निषेध करता तर मग माझ्या हातून असले हिंसात्मक कर्म का करविता?
तरी हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवीतु आहासी ॥
तर हृषीकेशा, याचा आपणच विचार करा की, आपण कर्ममार्गाला मान देऊन माझ्या हातून ही एवढी भयंकर हिंसा करवीत आहात!
देवा तुवांचि ऐसें बोलावे । तरी आम्हीं नेणतीं काय करावें । आतां संपलें म्हणू पां आघवें । विवेकाचें ॥
देवा, तुम्ही जर असे बोलू लागला, वा आम्ही अज्ञान्यानी काय करावे? तर आताच सर्व विचार संपला असे म्हणण्याची पाळी आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -