घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसे शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणौनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ॥
याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत पिऊन जे तृप्त होऊन अमर होतात, ते सहज ब्रह्मत्व पावतात.
येरां विरक्ती माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जे योगयागु न करितीचि । जन्मले साते ॥
ज्यांच्या हातून या यज्ञाचे आचरण घडत नाही, ज्यांना विरक्ती माळ घालीत नाही, ज्यांना आत्मसंयमन करता येत नाही व जन्मास आले असता योगयागही करीत नाहीत;
जयांचें ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणौनि असो हे गोठी पाहीं । पंडुकुमरा ॥
अर्जुना, ज्यांची इहलोकी धडगत नाही, त्यांची परलोकची हालहवाल कशाला पुसतोस? त्यांच्याविषयी गोष्टच बोलणे नको.
ऐसे बहुतीं परी अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारूनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥
अशाप्रकारे जे तुला पुष्कळ प्रकारचे (बारा) यज्ञ सांगितले, त्यांच्याबद्दल वेदात पुष्कळ विस्ताराने चांगले वर्णन केले आहे.
परी तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥
परंतु वेदातील त्यांचे वर्णन ऐकून आपल्याला काय करावयाचे आहे? त्यातील सार हेच की, हे सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले असता कर्माची बाधा होणार नाही.
अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जया नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥
अर्जुना ज्या यज्ञाचे मूळ वेद आणि ज्यात क्रियाचा खटाटोप खूप आहे व ज्याचे पहिले फळ स्वर्ग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -