घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ॥
ज्याप्रमाणे चैतन्य दुसरे नाही, ते एकच; त्याप्रमाणे या लोकी ज्ञान हीच एक उत्तम वस्तू असून त्याच्या बरोबरीची दुसरी वस्तू नाही.
या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥
जर सूर्याचे कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येईल,
नातरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे । तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ॥
किंवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू जर सापडेल, तरच अर्जुना, ज्ञानासारखी दुसरी वस्तू संभवेल!
म्हणौनि बहुतीं परीं पाहतां । पुढतपुढतीं निर्धारितां । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥
म्हणून, पुष्कळ प्रकाराने अनेक वेळा विचार करून पाहता, या ज्ञानाचे पावित्र्य एका ज्ञानालाच आहे.
जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥
अमृताची चव कोणी विचारिली असता ती जशी अमृतासारखी आहे असे म्हणावे लागते, तशी ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येते.
आतां यावरी जें बोलणें । तें वायांचि वेळु फेडणें । तंव सांचचि हें प्राथु म्हणे । जें बोलत असां ॥
आता यापेक्षा ज्ञानाविषयी जास्त चर्चा करणे म्हणजे वेळ व्यर्थ घालविणे होय, तेव्हा अर्जुन म्हणाला,‘तुम्ही बोलता ते खरे आहे.’
परी तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें । तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥
‘पण ते ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त करून घ्यावे’ असे जो अर्जुन विचारणार, तो त्याचे मनातील हेतु देवांनी जाणला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -