Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा ।
हा तोचि होईल ॥
शब्दविषय, सहज पाहिले तर कानाचा आहे; परंतु जीभ हा रस आमचा आहे असे म्हणेल व नाकालाही हा आमचा गंध विषय आहे, असा भास होण्याला कारण, हा शब्दविषयच होईल.
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ॥
यापेक्षा आणखी नवल कोणते, की बोलण्याची नुसती सरणी पाहून डोळे तृप्त होतील; आणि त्यांना असे वाटू लागेल की, हे बोल नसून ही प्रत्यक्ष रूपाची खाणच निर्माण झाली आहे!
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें । बोलु भुजाही आविष्करे । आलिंगावया ॥
जेव्हा शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मनच बाहेर निघेल आणि आपले बाहु उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्याला धावेल.
ऐशीं इंद्रियें आपुलालियां भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्रकरु ॥
याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला झोंबतील; परंतु तो शब्दही सगळ्यांना सारखेपणाने शांत करील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो,
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥
त्याप्रमाणे शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे, असे समजा; आणि जो त्यांचा अर्थ जाणणारा आहे, त्याला त्यांचे ठिकाणी चिंतामणीसारखे गुण आढळून येतात.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -