Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां आणिकांचिया गोठी । कायशा सांगों किरीटी । देखें मीचि इये राहाटी । वर्तत असें ॥
अर्जुना, आता फार लांब दुसर्‍याच्या गोष्टी कशाला सांगत बसू. मीच या धर्माचरणांत वागत आहे.
काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥
आता, मला काहीतरी एखादे संकट पडले असेल किंवा कोणती तरी इच्छा असेल, म्हणून मी स्वधर्माचे आचरण करितो, असे जर तू म्हणशील,
तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझ्या अंगीं । जाणसी तूं ॥
तर या जगात माझ्या इतका गुण व ऐश्वर्य यांनी संपन्न दुसरा कोणी नाही. हे माझे सामर्थ्य तुला माहीत आहेच;
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥
सांदिपनी गुरुचा मेलेला मुलगाही आणून दिला, तो पराक्रम तू पहिलास; पण असाही जो निरिच्छ तोसुद्धा कर्ममार्गाचे मुकाट्याने आचरण करीत आहे.
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाची एका उद्देशा । लागोनियां ॥
परंतु त्या एका लोककल्याणाच्या उद्देशानेच एखाद्या सकाम पुरुषाने जसे धर्माचरण करावे तसाच मी स्वधर्माचे आचरण करितो.
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥
कारण, सर्व प्राणी आमच्यावर अवलंबून आहेत. तेव्हा त्यांनी कर्मभ्रष्ट होऊ नये.
आम्ही पूर्णकाम होउनी । जरी आत्मस्थिती राहुनी । तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल? ॥
आम्ही निष्काम होऊन आत्मानंदामध्येच राहिलो आणि धर्माचरण केले नाही, तर प्रजेचा तरणोपाय कसा होईल?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -