घरमनोरंजन२.० ने दोन दिवसात कमवला इतका गल्ला

२.० ने दोन दिवसात कमवला इतका गल्ला

Subscribe

२.० हा सिनेमा तेलगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात करण्यात आला आहे. सिनेमातील VFX मुळे हा सिनेमा लहान मुलांना देखील आवडत आहे. शिवाय हा सिनेमा 3D आणि 2D दोन्हीमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे

थलायवा रजनीकांतचा २.० सिनेमा हा सिनेमा फिल्मी फ्रायडेला नाही तर गुरुवारी रिलीज करण्यात आला. रजनीकांत यांचा प्रत्येक सिनेमा दक्षिणेतील त्यांच्या फॅन्ससाठी पर्वणी असते. २.० हा रोबाचा सिक्वल असून या सिनेमात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारदेखील आहे. त्यामुळे सगळीकडेच या सिनेमाची चर्चा आहे. रजनीकांत यांचा हा सिनेमा हिट होणार यात काही शंकाच नव्हती. सिनेमा रिलीज होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत. पण या सिनेमाने अवघ्या२ दिवसात १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. हा सिनेमा एकाचवेळी तेलगू, तामिळ, हिंदी भाषेत रिलीज झाला आहे.

वाचा- रजनीकांत-अक्षयचा बिग बजेट 2.0 चित्रपट ऑनलाईन लीक

कितीचा जमवला गल्ला?

आकडेवारीनुसार या सिनेमाने एका दिवसात तब्बल १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या दिवशी केवळ चेन्नईमध्ये ४.७७ कोटींचा गल्ला या सिनेमाने कमावला. पहिल्या दिवशीच्या तुलनेत यात दुप्पटीने वाढ झाली. पहिल्या दिवशी चेन्नईमध्ये २.३७ कोटीची कमाई केली होती. तर हिंदीमध्ये या सिनेमाने अधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी तब्बल २०.२५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत या सिनेमाने १९ कोटीची कमाई केली.

- Advertisement -
वाचा कसा आहे सिनेमा –यांत्रिकी सुख, भास की धोका? अतुलनीय अनुभवाचा २.०

इतर भाषांमध्ये चांगला प्रतिसाद

२.० हा सिनेमा तेलगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात करण्यात आला आहे. सिनेमातील VFX मुळे हा सिनेमा लहान मुलांना देखील आवडत आहे. शिवाय हा सिनेमा 3D आणि 2D दोन्हीमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हॉलीवूडला टक्कर देणारे VFX या सिनेमात असल्यामुळे ते पाहण्यासाठी आणि २.० रजनीकांतचा नवा अवतार पाहण्यासाठी सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. हिंदीत हा सिनेमा धर्मा प्रोडक्शन निर्मित आहे.

हे माहित आहे का?- रोबोट २.० – प्रदर्शित होण्यापूर्वीच केली तब्बल ३७० कोटींची कमाई

पुन्हा येणार चिट्टी

पहिल्या भागात डिस्मेंटल करण्यात आलेला चिट्टी रोबो या भागात अक्षय कुमारच्या विलन अवताराशी दोन हात करताना दिसला. आता या सिनेमाचा सिक्वल म्हणजेच ३.० येणार असल्याची जाहिरात देखील या सिनेमामध्ये करण्यात आली आहे. हा व्हिडिओ स्वत: अक्षय कुमार ट्विट केला आहे

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -