घरमनोरंजनघटस्फोट : शेवट नव्हे; नव्याने प्रवासाला सुरुवात!

घटस्फोट : शेवट नव्हे; नव्याने प्रवासाला सुरुवात!

Subscribe

अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेत असल्याचे एकत्रितरित्या जाहीर केले आहे. ते आता मुलगा आझादचे आई-वडिल म्हणून जबाबदारी पार पाडतील.

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी त्यांचे १५ वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांनाचा बुचकळ्यात टाकले. एकमेकांना समजून घेणारे, प्रत्येक कामामध्ये एकमेकांना साथ देणारे, वैचारिक-सामाजिक पातळीवर एकमेकांचा आदर करणारे आमिर आणि किरण अखेर विभक्त का होत आहेत. असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला. आमिरने नेहमीच किरण राव हिला एका खंबीर व्यक्तिमत्व असलेली महिला मानले आहे. तिच्यातील हाच गुण आमिरला विशेष भावल्याचे त्याने अनेकदा त्याच्या मुलाखतींतून म्हटले आहे. मग असे काय झाले की त्यांनी पती-पत्नीच्या नात्याला पूर्णविराम दिला. याचे उत्तर आमिर आणि किरणच जाणे.

- Advertisement -

पती-पत्नीच्या नात्यातून हे दोघे बाहेर पडले असले तरी आता सह माता-पित्याची भूमिकेतून ते जोडले जाणार आहेत. आमिर आणि किरणने जारी केलेल्या सोशल मीडियावरील पत्रकात त्यांनी १५ वर्षाच्या वैवाहिक जीवनातून बाहेर पडलो असलो तरी कामांच्या माध्यमातून तसेच सह माता-पिता म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय दोघांनीही सामंजस्याने हा निर्णय घेतल्याचे या पत्रकातील मजकूरात दिसून येते. एक प्रगल्भ आणि विचारपूर्ण निर्णय त्या दोघांनी घेतला असून हाच त्यांच्यासाठी योग्य निर्यण असल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे घटस्फोट म्हणजे सर्वकाही संपले, हा सहजीवनाचा शेवट अशी भावना मनात न आणता एका नव्या प्रवासाची सुरूवात, वेगळ्या नात्यातून एकत्र बांधून राहण्याचा प्रयत्न असे त्यांनी पत्रकाच्या अखेरीस नमूद केले आहे.

aamir kiron aazad
आमिर खान, किरण राव आणि आझाद राव खान

आमिर – किरणची अशी झाली ओळख

२००१ साली दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि थेट ऑस्करपर्यंत पोहोचला. या चित्रपटातून आमिरने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. तिथेच त्याची पहिल्यांदा किरण रावसोबत ओळख झाली. किरण राव या सिनेमात सहदिग्दर्शकाचे काम पाहत होती. मात्र ती केवळ वरवरची ओळख होती असे त्याने नंतरच्या काळात स्पष्ट केले. आमिरने २००२ साली त्याची पहिली पत्नी रिनासोबत घटस्फोट घेतला होता. या काळात आमिर खुपच डिस्प्रेस आणि हताश झाला होता. अशावेळी किरणचा एक फोन कॉल त्याच्यासाठी उमेदीची किरण बनली. त्यावेळी झालेल्या ३० मिनिटांच्या संवादामध्येच आमिरने किरणसोबत जवळीच वाढवण्याचा निर्णय घेतला. पुढे काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २८ डिसेंबर २००५ साली लग्न केले. दोघांनी अनेक प्रोजेक्ट एकत्र केले. महाराष्ट्रातील बिकट समस्या असलेल्या पाणी प्रश्नावर तोडका काढण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमिर आणि किरणने अभूतपूर्व योगदान दिले. पुढे सरोगसीने ५ डिसेंबर २०११ साली त्यांनी मुलाला जन्म दिला. आझाद राव खान अशी ओळख ते आपल्या मुलाची सांगतात. आता या मुलाच्या पालन पोषणसाठी दोघे केवळ पालकत्वाच्या नात्याने एकमेकांसोबत बांधिल राहण्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या १५ वर्षात आयुष्यातील अनेक चढ-उतार, बरे-वाईट क्षण, मजामस्ती एकत्र अनुभवल्यानंतर अखेर ३ जुलै २०२१ रोजी त्यांनी विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

- Advertisement -
आमिर खान आणि रिना दत्ता

आमिरचा दुसऱ्यांदा घटस्फोट

आमिर खान याने १९८७ साली ‘कयामत सें कयामत तक’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिने जगतात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत पदार्पण केले. त्याच काळात म्हणजे १८ एप्रिल १९८६ रोजी त्याने आपली पहिली पत्नी रिना दत्ता हिच्याशी लग्न केले. आमिर तेव्हा अवघ्या २१ वर्षांचा होता. पुढे आमिरचे फिल्मी करिअर सुरू झाले आणि तो सुपरस्टारपर्यंतच्या शिखरावर पोहोचला. आमिर आणि रिना यांना मुलगा जुनैद आणि मुलगी इरा हे दोन अपत्य आहेत. मात्र २००२ साली या दोघांच्या घटस्फोटाची बातमी आली. दोन्ही मुलांची कस्टडी रिनाला मिळाली. त्यानंतरही आमिरने मुलांशी तसेच रिनाशी संपर्क ठेवला. अजूनही अनेकदा पार्टी, फॅमिली फक्शन्समध्ये या सर्वांना एकत्रित पाहिले जाते. त्यामुळे नाते संपले तरी मनात कोणतेही किलमिश न ठेवता कसे जोडून राहायचा हे आमिरच्या पहिल्या घटस्फोटानंतर पाहायला मिळाले. मात्र रिनासोबत १६ वर्षांचा संसार मोडल्यानंतर पुन्हा एकदा आमिरने आपला किरण सोबतचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आणला आहे. तसे आज या दोघांनी त्यांच्या चाहत्यांसमोर जाहीर केले आहे.

हेही वाचा –

कंगनाचा दावा खोटा आणि कोर्टाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांचा आरोप

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -