घरताज्या घडामोडीआमिर खानच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज; ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलली

आमिर खानच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज; ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलली

Subscribe

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. दरम्यान महाराष्ट्रात चित्रपटगृह खुली करण्याची घोषणा केल्यानंतर सर्व मोठ्या स्टार्सने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. यापैकी एक आमिर खान होता. आमिर खानने आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. परंतु आता आलियाच्या ‘गंगुबाई काठिवाडीया’सोबत आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त पुन्हा टळला आहे.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार काही कारणांमुळे आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा मोठा ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ही व्यक्तीरेखा लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीएफएक्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे हे काम करण्यासाठी जितक्या वेळेचा अंदाज वर्तवला जात होता, त्यापेक्षा अधिक वेळ लागत आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना यामध्ये घाई नको आहे. तसेच आमिर कोणतेही चित्रपट घाईत करत नाही. त्यामुळे आमिरचा हा आगामी चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होऊ शकतो. तोपर्यंत या चित्रपटातील वीएफएक्स आणि पोस्ट प्रोडक्शनचे सर्व काम पूर्ण होईल. जर आमिरच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ११ फेब्रुवारी २०२२ राहिली तर दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपट ‘केजीएफ २’सोबत टक्कर होऊ शकते.

- Advertisement -

टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गंप (१९९४)’चा रिमेक ‘लाल सिंह चड्ढा’ असणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा आमिर खान आणि करीना कपूरची जोडी पाहता येणार आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. यावर्षी मुंबईत शूटिंग पूर्ण झाली आणि त्यानंतर सेटवर चित्रपटातील कलाकारांनी केक कापून आनंद व्यक्त केला होता. या चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य देखील दिसणार आहे.


हेही वाचा – Dance Deewane 3च्या सेटवर लहान मुलीची चेष्टा करणं राघव जुयालला पडलं महाग; ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -