घरमहाराष्ट्रCruise Drugs Case : नवाब मलिकांनी शेअर केल्या केपी गोसावीच्या 'त्या' ऑडिओ...

Cruise Drugs Case : नवाब मलिकांनी शेअर केल्या केपी गोसावीच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिप

Subscribe

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर आक्षेप घेत अनेक गौप्यस्फोट करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता आणखी एक पुरावा सादर केला आहे. नवाब मलिक यांनी केपी गोसावीच्या ऑडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. किरण गोसावी आणि खबऱ्याची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी केपी गोसावी आणि खबरीचे व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे संबंध काय आहेत? असा सवाल केला होता. त्यानंतर आता ४ ऑडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये किरण गोस्वी एका खबऱ्यासोबत बोलत असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

काशिफ खान-समीर वानखेडे यांच्यात काय संबंध?

नवाब मलिक यांनी आज चॅटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये गोसावी आणि एका व्यक्तीमध्ये काशिफ खान संदर्भात झालेल्या संभाषण झाल्याचं दिसतंय. यावरुन मलिक यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. के.पी. गोसावी आणि खबरी यांच्यामध्ये काशिफ खानबद्दलचं व्हॉट्सॲप चॅट. काशिफ खानला प्रश्न का विचारले जात नाहीत? काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -